रेल्वेची अमुल्य जमीन सरकार खासगी कंपन्यांना देण्याच्या तयारीत

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

दिल्लीमधील काश्मिरी गेट आणि मेट्रोलगत असलेल्या रेल्वे कॉलनीची जमीन भारत सरकार एका खासगी कंपनीला देण्याच्या तयारीत आहे. यासाठी ऑनलाईन लिलाव घेण्यात येणार असून 27 जानेवारी ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.

नवी दिल्ली- दिल्लीमधील काश्मिरी गेट आणि मेट्रोलगत असलेल्या रेल्वे कॉलनीची जमीन भारत सरकार एका खासगी कंपनीला देण्याच्या तयारीत आहे. यासाठी ऑनलाईन लिलाव घेण्यात येणार असून 27 जानेवारी ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. सुमारे 21800 चौ.मी. असलेला हा भूभाग मध्य दिल्लीतील अत्यंत मोलाचा भूभाग मानला जातो. हा भूभाग खरेदी करण्यासाठी 396 कोटी रूपये किमान आधारभूत किंमत ठेवण्यात आली आहे. 
 
दिल्लीच्या मध्यभागी असलेल्या या भूभागावर पुढील काही वर्षांमध्ये कॉलनी मॉलसह दुकानांचे बांधकाम करण्यात येणार आहे. रेल्वेच्या या रिकाम्या पडलेल्या जागेच्या विकासासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणांची निर्मीती करण्य़ात आली होती. आरएलडीएचे उपाध्यक्ष वेदप्रकाश डुडेजा यांच्या माहितीनुसार नवी दिल्ली, देहराडून, यांसह अनेक शहरांतील रेल्वेच्या भूभागांवर विकासाच्या दृष्टीकोनातून काम सुर आहे. 
 
 रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने मागील महिन्यात वाराणसी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत वसुंधरा लोको रेल्वे कॉलोनीच्या पूनर्विकासासाठी ऑनलाईन लिलाव करण्याचे ठरवले होते. या योजनेअंतर्गत एकूण जमीन 2.5 हेक्टर ठरवण्यात आली होती. आरएलडीएने या योजनेसाठीचा भाडेकराराचा कालावधी 45 वर्षे इतका ठेवला आहे. 

संबंधित बातम्या