राकेश झुनझुनवाला करणार 'आकाशावर' राज्य, ‘अकासा एअर’ला हिरवा कंदील

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची विमान कंपनी अकासा एअरला (Akasa Airline) नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे.
राकेश झुनझुनवाला करणार 'आकाशावर' राज्य,  ‘अकासा एअर’ला हिरवा कंदील
Rakesh Jhunjhunwala in Airline Sector Akasa Airline gets NOC Dainik Gomantak

शेअर बाजारातील (Stock Market) दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची विमान कंपनी (Airline) अकासा एअरला (Akasa Airline) नागरी उड्डयन मंत्रालयाकडून (Ministry of Civil Aviation) ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाले आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड 'अकासा' एअर या ब्रँड नावाने काम करेल. जर सर्व काही ठीक झाले तर पुढील उन्हाळ्यात 'आकाशची' विमाने आकाशात उडताना दिसतील. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झुनझुनवाला यांच्यात एक बैठक झाली होती. (Rakesh Jhunjhunwala in Airline Sector Akasa Airline gets NOC)

नव्याने स्थापन झालेल्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “नागरी उड्डयन मंत्रालयाच्या पाठिंब्याबद्दल आणि एनओसीच्या मंजुरीबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. आकासा एअरलाइन्स यशस्वीपणे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अनुपालनांसाठी आम्ही अधिकाऱ्यांशी संल्गनपाने काम करत राहू." त्याचबरोबर “आमचा विश्वास आहे की देशाच्या प्रगतीसाठी मजबूत हवाई वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. या विश्वासामुळे आम्हाला आधुनिक आणि किफायतशीर विमान सेवा सुरू करण्यास प्रवृत्त केले आहे."

Rakesh Jhunjhunwala in Airline Sector Akasa Airline gets NOC
अर्थमंत्री निर्मला सीतारामण अमेरिकेच्या दौऱ्यावर

इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष हेही आकासा एअरच्या बोर्डात आहेत. पुढील चार वर्षात सुमारे 70 विमाने चालवण्याची विमानसेवेची योजना आहे.

एअरबसचे मुख्य व्यावसायिक अधिकारी ख्रिश्चन शेरर यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की त्यांची एअरबस कंपनी या साऱ्या करारासाठी 'अकासाशी' चर्चा करत आहे. त्याचवेळी, सुमारे दोन महिन्यांपूर्वी, काही माध्यमांच्या अहवालात असे म्हटले आहे की, B737 MAX विमान खरेदीवर आकाश विमान अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगशी चर्चा करत आहे. एअरबस ए 320 मालिकेची विमाने बोईंग बी 737 मालिकेतील विमानांचे प्रतिस्पर्धी आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांच्यात एक बैठक झाली होती . बैठकीनंतर मोदींनी ट्विट करून म्हटले होते, 'राकेश झुनझुनवाला यांना भेटून आनंद झाला. तो जिवंत आणि व्यावहारिक तर आहेतच मात्र भारताबद्दल खूप आशावादी आहेत. 'काही दिवसांपूर्वी जेव्हा झुनझुनवाला यांना पंतप्रधानांसोबतच्या भेटीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी फार काही न बोलता सांगितले की त्यांच्यात अर्थव्यवस्थेविषयी चर्चा झाली आहे.

Related Stories

No stories found.