Areez Khambatta Died: प्रसिद्ध 'रसना' कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष अरीज खंबाटा यांचे निधन

रसना या ब्रॅण्डचे शीतपेय जगभरातील 60 देशांमध्ये विकले जाते.
Areez Khambatta Died
Areez Khambatta DiedDainik Gomantak

प्रसिद्ध 'रसना' कंपनीचे (Rasana) संस्थापक आणि अध्यक्ष अरीज पिरोजशॉ खंबाटा (Areez Khambatta Died) यांचे निधन झाले आहे. भारतासह साठ देशांच्या बाजारपेठेत आजही रसनाची विक्री होते. अरीज खंबाटा हे अरीज खंबाटा बेनेवॉलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्ष होते. 85 वर्षांचे खंबाटा यांनी शनिवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. कंपनीने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

Areez Khambatta Died
What Is A Narco Test: आफताबची नार्को टेस्ट कधी? नार्को टेस्ट म्हणजे काय व कशी केली जाते?

अरीज खंबाटा (Rasana Founder Areez Khambatta Passes Away) यांना रसना या लोकप्रिय घरगुती शीतपेयासाठी ओळखले जातात. भारतात सध्या 18 लाख किरकोळ दुकानांवर रसनाची विक्री होते. तसेच, सध्या रसना या ब्रॅण्डचे शीतपेय जगभरातील 60 देशांमध्ये विकले जाते. 1970 दशकात स्वस्त आणि मस्त शीतपेय म्हणून रसना देशभरात लोकप्रिय झाला. अरीज खंबाटा यांच्या निधनाने उद्योग आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Areez Khambatta Died
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका, केली मोठी मागणी

अरीज खंबाटा हे अहमदाबाद पारशी पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. तसेच, पारशी-इराणी झोराष्ट्रीयन समुदायाची संघटना असलेल्या WAPIZ या संघटनेचेही अध्यक्ष होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com