Ration Card: मोफत राशन घेणाऱ्यांना झटका, सरकारने केली मोठी कारवाई; या लोकांसाठी...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana: जर तुम्ही सरकारच्या विनामूल्य राशन योजनेंतर्गत दरमहा राशन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Ration Card Latest News
Ration Card Latest NewsDainik Gomantak

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana: जर तुम्ही सरकारच्या विनामूल्य राशन योजनेंतर्गत दरमहा राशन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकार अपात्र राशन कार्डधारकांविरुद्ध मोहीम चालवत आहे.

या अंतर्गत हरियाणामध्ये 9 लाख राशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. याविषयी माहिती देताना मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, राज्य सरकारने गेल्या वर्षभरात 80 टक्के राशनकार्डे रद्द केली आहेत. एप्रिल 2023 पासून बजेटच्या नवीन तरतुदींवर काम सुरु केले जाईल.

9 लाख लोकांपैकी 3 लाख लोक आयकर भरतात

मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या वापरावर जोर देण्यात आला आहे. जेणेकरुन पात्र लोकांना योजनांचा फायदा मिळू शकेल.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पीपीजीद्वारे 12 लाख नवीन राशनकार्डे तयार केली गेली आहेत. 9 लाख बनावट राशनकार्डे (Ration Card) रद्द केली आहेत. त्याचबरोबर, 9 लाखांपैकी 3 लाख लोक आयकर भरलेल्या 3 लाख लोकांचा समावेश होता. इतकेच नव्हे तर 80 हजार सरकारी कर्मचारी देखील होते.

Ration Card Latest News
Ration Card: राशनकार्डधारकांना मोठा दिलासा! देशभरात नवीन नियम लागू

80 कोटी लोकांना मोफत राशन दिले जात आहे

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोदी सरकारच्या वतीने देशातील 80 कोटी लोकांना मोफत राशन दिले जात आहे.

याशिवाय, विविध राज्य सरकारेही (Government) गरिबांना राशन देत आहेत. राशन देण्यासाठी शासनाकडून पात्रता अटी ठेवण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांत या योजनेसाठी पात्र नसलेल्या लोकांनीही राशन योजनेचा लाभ घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com