Ration Card: राशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय!

Free Ration Scheme: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे (PMGKAY) लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Ration Card Holders
Ration Card HoldersDainik Gomantak

Ration Card Latest News: जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल आणि तुम्ही केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे (PMGKAY) लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 28 सप्टेंबर रोजी झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गरिबांसाठीच्या अन्न योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार ही योजना 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. आता पुन्हा एकदा या योजनेशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.

मोफत राशन योजना मार्चपर्यंत वाढणार आहे

सरकार (Government) मोफत राशन योजनेला पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा विचार करत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत घोषणा होऊ शकते. सध्या 10 ते 15 डिसेंबर या कालावधीत चालू महिन्याचे राशनवाटप केले जाणार आहे. या महिन्याचे राशन लाभार्थ्यापर्यंत पोहोचू लागले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) एप्रिल 2020 मध्ये सुरु करण्यात आली.

Ration Card Holders
Ration Card: लॉटरी! केंद्राचा मोठा निर्णय, मोफत राशनबाबतचा नवा नियम देशभर लागू

80 कोटी लाभार्थ्यांना 5 किलो धान्य मोफत

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत, देशातील 80 कोटी लाभार्थ्यांना 5 किलो धान्य मोफत दिले जाते. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सरकारने मोफत राशन योजना सुरु केली होती. एप्रिल 2020 मध्ये सुरु झालेली ही योजना मार्च 2022 मध्ये सहा महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. नंतर ती तीन महिन्यांसाठी डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. आता ती पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा विचार केला जात आहे.

Ration Card Holders
Ration Card: राशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी! सरकारचा आला 'हा' नवा आदेश

अन्न योजना 2024 पर्यंत सुरु राहणार!

सरकार 2024 पर्यंत ही योजना सुरु ठेवणार असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. सरकारकडून या योजनेत पुन्हा एकदा वाढ करण्याचा विचार केला तर 80 कोटी लोकांना त्याचा फायदा होईल. आतापर्यंत या योजनेवर सरकारने 3.50 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. PM गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com