Ration Card: मोफत राशन घेणाऱ्यांसमोर नवं संकट, प्रत्येक कार्डधारकाने हे जाणून घेणे महत्त्वाचे

Ration Card Update: अनेक जिल्ह्यांमध्ये राशन वाटपास विलंब होत आहे.
Ration Card
Ration CardDainik Gomantak

Ration Card Latest News: ज्या लोकांना राशन कार्डद्वारे सरकारकडून मोफत राशन मिळत आहे, त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट आहे. हे अपडेट ऐकून तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल. उत्तर प्रदेशमध्ये नोव्हेंबर महिन्यासाठी राशनचे वितरण 15 नोव्हेंबरपर्यंत करायचे आहे. परंतु अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) अद्याप तांदूळ पुरवठा केलेला नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये राशन वाटपास विलंब होत आहे.

तांदूळ आल्यावर वाटप सुरु होईल

राज्यातील बहुतांश राशन दुकानांमध्ये फक्त गहू, साखर, हरभरा, तेल आणि मीठ पोहोचले आहे. मात्र अद्याप तांदूळ इथपर्यंत पोहोचलेला नाही. राशन दुकानांमध्ये लवकरच तांदूळ पोहोचणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर राशन वाटपाचे काम सुरु करण्यात येणार आहे. तांदळाचा पुरवठा न झाल्याने नोव्हेंबरमध्ये राशनचे वाटप होऊ शकले नाही. वितरण व्यवस्थेतील ढिसाळ कारभारामुळे यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत.

Ration Card
Ration Card: शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी घोषणा, 30 दिवसांत करा हे काम; सरकारने बदलले नियम

राशनकार्डधारकांना प्रतीक्षा करावी लागली

वास्तविक, राशन दुकानांवर तांदूळ वाटप न केल्यामुळे पॉइंट ऑफ सेल्स मशीन (PoS) राशन वितरणास परवानगी देत ​​नाही. यामुळे राशनकार्डधारकांना इच्छा नसतानाही प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ पुरवठ्यासाठी विलंब का होत आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तांदूळ आल्यानंतर लवकरच राशनचे वाटप सुरु होईल, अशी अपेक्षा आहे.

Ration Card
Ration Card: केंद्र सरकारच्या या निर्णयाने कार्डधारकांना मोठा दिलासा! नवा नियम देशभर झाला लागू

राशनकार्ड सरेंडर झाल्याची बातमी खोटी आणि दिशाभूल करणारी आहे

मे-जून महिन्याच्या सुरुवातीला, विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, योगी सरकारने अपात्र राशनकार्डधारकांना त्यांचे कार्ड सरेंडर करण्यास सांगितले आहे. राशनकार्ड सरेंडर न करणाऱ्यांकडून सरकार वसूल करेल, असेही सांगण्यात आले. त्यानंतर ही बातमी लाभार्थ्यांमध्ये झपाट्याने पसरली होती. विशेष म्हणजे, अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांनी आपले राशनकार्ड (Ration Card) जमा करण्यासाठी रांगाही लावल्या होत्या. परंतु सरकारने (Government) नंतर स्पष्ट केले की, राशन कार्ड सरेंडर करण्याचा किंवा रद्द करण्याचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com