मोदी सरकारची संसदेत मोठी घोषणा, Ration Card शिवाय घेता येणार रेशनचा लाभ!

केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शिधापत्रिकाधारकांना मोठ्या सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Ration Card
Ration Card Dainik Gomantak

केंद्रातील मोदी सरकारने शिधापत्रिकाधारकांना मोठ्या सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने संसदेत सांगितले की, 'रेशनची सुविधा घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड (Ration Card) असणे आवश्यक असणार नाही.' यासंबंधीची माहिती देताना अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी संसदेत सांगितले की, 'आता शिधापत्रिकाधारकांना रेशनची सुविधा मिळवण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही.' (Ration cardholders no longer need to show ration cards to avail ration facility)

दरम्यान, रेशनकार्ड दाखवूनच लोक रेशन घेऊ शकतात. मात्र आता नागरिकांना ते राहत असलेल्या रेशन दुकानात जाऊन रेशन नंबर आणि आधार क्रमांक सांगावा लागेल. त्यानंतर त्यांना सहज रेशन मिळेल.

Ration Card
आता UPI वापरणे सोपे होणार, बँक किंवा आधार केंद्रात जाण्याची गरज नाही

77 कोटी लोकांना लाभ मिळत

पियुष गोयल म्हणाले की, ''नवीन तंत्रज्ञानाद्वारे तुम्हाला रेशन देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. आता देशात वन नेशन वन रेशन कार्डची सुविधा सुरु झाली आहे.'' आता देशात वन नेशन वन रेशन कार्डची (One Nation One Ration Card) सुविधा सुरु झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 77 कोटी लोक वन नेशन वन रेशन कार्डद्वारे जोडले गेले आहेत. यामध्ये एकूण रेशन कार्ड वापरकर्त्यांच्या 96.8 टक्के लोकांचा समावेश आहे. यामध्ये 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

Ration Card
आधार कार्डमध्ये आता मोठा बदल! वडिलांचा किंवा पतीचा पत्ता कट

अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता रेशनचा लाभ

पियुष गोयल पुढे म्हणाले की, ''जर एखाद्या व्यक्तीचे रेशनकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि तो नोकरीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबासह इतर शहरात राहत असेल, तर त्याला त्याचा रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन कोणत्याही रेशन दुकानातून रेशन मिळू शकते. यासाठी आता मूळ शिधापत्रिका दाखवण्याची गरज भासणार नाही. वन नेशन वन रेशनसाठी केंद्र सरकारने (Central Government) आतापर्यंत राज्य सरकारांना कोणतीही सूचना दिलेली नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com