आरबीआयने जीडीपी वाढीचा दर घटविला, रेपो रेट मात्र जेसे थे

आरबीआयने जीडीपी वाढीचा दर घटविला, रेपो रेट मात्र जेसे थे
S. Das.jpg

नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या मुद्रा धोरण समितीचा निकाल (RBI MPC Outcome) शुक्रवारी समोर आला आहे. आरबीआय गवर्नर (RBI Governor) शक्तीकांत दास यांनी आर्थिक धोरण जाहीर केले. यावेळीसुद्धा रेपो दरात कोणताही बदल झालेला नसून, रेपो दर 4 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. तसेच २०२१-२२ या वर्षात जीडीपीचा दर १०.५ टक्क्यांवरुन ९.५ टक्के इतका घटविण्यात आला आहे. 

याबाबत बोलताना गवर्नर दास म्हणाले, आर्थिक सुधारणांच्या धोरणात्मक दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत ही भूमिका कायम ठेवली जाईल. एप्रिलमध्ये झालेल्या एमपीसीच्या मागील बैठकीत आरबीआयने महत्त्वाच्या व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. यंदा चांगला असणारा मॉन्सून, कृषि क्षेत्राची क्षमता आणि जागतिक रिकवरीला लक्षात घेऊन आर्थिक परिस्थितीत गती येऊ शकते. 

जीडीपी ग्रोथचा अंदाज घटविला 

२०२१-२२ या आर्थिक वर्षाचा जीडीपीचा वास्तविक अंदाज 9.5 टक्के ठेवण्यात आला आहे. ते म्हणाले, की रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात आर्थिक वाढीचा अंदाज 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मधील सीपीआय चलनवाढीचा अंदाज  5.1% इतका आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी 15 हजार कोटींची एक वेगळी लिक्विडिटी विंडो उघडण्यात आली आहे. या अंतर्गत बँका, हॉटेल-रेस्टॉरंट, पर्यटन आदी विभागांना कर्ज देता येऊ शकेल. ही योजना 31 मार्च 2021 पर्यंत सुरु राहील.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. तरी पहिल्या लटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर कमी परिणाम झाला आहे. लोकांनी या महामारीमध्ये व्यवसाय  करण्याचे अनेक पध्दती शोधून काढल्या आहेत.  येणाऱ्या काळात लसीकरण प्रक्रियेमध्ये वाढ करण्यात येईल. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी गती मिळेल.  रिझर्व बँक 17 जूनला 40 हजार कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीज खरेदी करेल. दुसर्‍या तिमाहीत 1.20 लाख कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज खरेदी केल्या जातील. असे दास यांनी स्पष्ट केले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com