आरबीआयने 500 आणि 1000 रूपयांच्या नोटाबंदीवर बँकांना दिल्या सूचना

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 जून 2021

8 नोव्हेंबर, 2016 रोजी सरकारने(Government of India) 500 आणि 1000 रुपयांच्या त्या वेळी जारी केलेल्या नोटा बंद(Note Bandi) केल्या होत्या.

8 नोव्हेंबर, 2016 रोजी सरकारने(Government of India) 500 आणि 1000 रुपयांच्या त्या वेळी जारी केलेल्या नोटा बंद(Note Bandi) केल्या होत्या. काळ्या पैशाची धारक आणि दहशतवाद वित्तपुरवठा विरोधात सरकारने हे पाऊल उचलले होते. यावेळी सरकारने लोकांना नोटा बंद करुन त्यांच्या बँक(Bank) खात्यात जमा करण्याची संधी दिली होती.

आता या संदर्भात, रिझर्व्ह बँकेने 8 नोव्हेंबर, 2016 ते 30 डिसेंबर, 2016 या कालावधीसाठी पुढील ऑर्डरपर्यंत बँकांना त्यांच्या शाखा आणि करेंसी चेस्ट च्या सीसीटीवी रिकॉर्डिंग पुढचे आदेश येइपर्यंत बँकमध्येच ठेवण्याचे निर्देश RBI ने दिले आहेत. नोटाबंदीच्या कालावधीत अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना बेकायदेशीर कार्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने हा आदेश दिला आहे.

अदाणींच्या कंपनीचे शेअर 20 टक्क्यांनी वधारले; 7 दिवसात गुंतवणूकदार मालामाल

विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या काळात नवीन चलन नोटा अवैधपणे जमा केल्याप्रकरणी तपास यंत्रणांनीही तपास सुरू केला आहे. अशा छाननीसाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना पुढील आदेश येईपर्यंत नोटाबंदीच्या काळात सीसीटीव्ही फुटेज नष्ट करू नये असे सांगितले आहे. त्यावेळी (8 नोव्हेंबर, 2016 रोजी) प्रचलित असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटांच्या 15.41 लाख कोटींपैकी 15.31 लाख कोटी रुपयांच्या नोटा सरकारला परत करण्यात आल्या.

RBIचा मोठा निर्णय; आता सुट्टीच्या दिवशीही खात्यात होणार पगार जमा!

500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा दिल्या
त्यावेळी प्रचलित असलेल्या नोटा सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या बंद केल्या आणि त्यांच्या जागी 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा दिल्या. त्यानंतर देशभरातील बँक शाखांच्या बाहेर प्रचंड गर्दी जमली. बंद झालेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी किंवा त्यांच्या जागी नवीन नोटा घेण्यासाठी लोक बँकाबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहिले. खरं म्हणजे नोटाबंदीच्या साडेचार वर्षानंतरही जुन्या 500 आणि 100 रुपयांच्या नोटांची प्रकरणे चर्चेत येत आहेत. याबाबत अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. अशा परिस्थितीत बँकांचे सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डिंग ईडीच्या तपासणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

संबंधित बातम्या