आता देशात BhartaPeची पहिली डिजिटल बँक, RBI ने दिली मंजुरी

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मंगळवारी सेंट्रल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि भारतपे यांच्या कन्सोर्टियमला ​​स्मॉल फायनान्स बँकला मंजुरी दिली आहे .
आता देशात BhartaPeची पहिली डिजिटल बँक, RBI ने दिली मंजुरी
RBI grant new Small Finance Bank Centrum Financial Services Limited & BharatPeDainik Gomantak

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मंगळवारी सेंट्रल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (Centrum Financial Services Limited) आणि भारतपे यांच्या कन्सोर्टियमला ​​स्मॉल फायनान्स बँकला (Small Finance Bank)मंजुरी दिली आहे . सुमारे 6 वर्षांच्या अंतरानंतर RBI कडून नवीन बँक परवाना जारी करण्यात आला आहे, असे सेंट्रमने नियामक दाखल करताना म्हटले आहे. सेंट्रम आणि भारतपे च्या क्षमतेमध्ये दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही आरबीआयचे आभार मानतो असे देखील मंडळाकडून सांगण्यात आले आहे. (RBI grant new Small Finance Bank Centrum Financial Services Limited & BharatPe)

या नवीन स्मॉल फायनान्स बँकेचे नाव युनिटी स्मॉल फायनान्स बँक असेल. युनिटी हे नाव अनेक प्रकारे सेंट्रम आणि भारतपे या दोन्हीसाठी प्रचंड महत्त्व आहे. बँक स्थापन करण्यासाठी दोन भागीदार एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सेंट्रमचे MSME आणि मायक्रो फायनान्स व्यवसाय युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन केले जाणार आहेत.

RBI सेंट्रम समूहाचे कार्यकारी अध्यक्ष जसपाल बिंद्रा यांनी, आम्हाला परवाना मिळाल्याबद्दल आनंद होत आहे आणि एक मजबूत संघासह ही नवीन युग बँक उभारण्यासाठी भारतपे सोबत भागीदारी करण्यास आम्हाला आनंद झाला आहे. भारताची पहिली डिजिटल बँक बनण्याची आमची इच्छा असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

भारतपे चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर म्हणाले, “SFB परवान्यासह भारतपे आणि सेंट्रमचे एकत्रीकरण केल्याबद्दल मी आरबीआयचे आभार मानू इच्छितो. या संधीचे सोने करण्यासाठी आणि भारताची पहिली डिजिटल बँक उभारण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू."

RBI grant new Small Finance Bank  Centrum Financial Services Limited & BharatPe
देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळणार उभारी

यापूर्वी सेंट्रल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि भारतपे ने संकटग्रस्त सहकारी बँक पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (PMC बँक) विकत घेतली आहे. सेंट्रम आणि डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर स्टार्टअप कंपनी भारतपे आरबीआयकडून मंजुरी मिळाल्यानंतर यामध्ये 1,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेसने 1 फेब्रुवारी 2021 रोजी एक छोटी बँक स्थापन करण्यासाठी पीएमसी बँक घेण्याचा प्रस्ताव दिला होता. पीएमसी बँक सप्टेंबर 2019 पासून रिझर्व्ह बँकेच्या प्रशासनाखाली कार्यरत होती. ठेवीदारांचे 10,723 कोटी रुपयांहून अधिक पैसे अजूनही या बँकेत अडकले आहेत. त्याचप्रमाणे, बँकेच्या कर्जाचे एकूण 6,500 कोटी रुपये वसुलीमध्ये अडकले आहेत जे एनपीए म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com