RBI Guidelines: ग्रेट ! अखेर खातेदारांनी मान्य केली RBI ची ही गोष्ट, वाचा सविस्तर

RBI Guidelines: फसवणूक करणारे सामान्य लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे गायब करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत.
RBI
RBIDainik Gomantak

Reserve Bank of India: डिजिटायझेशनचे युग जसजसे वाढत आहे, तसतसे फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशा प्रकरणांचा विचार करुन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक ग्राहकांना OTP आणि CVV सारखी माहिती कोणाशीही शेअर करु नये असे सांगितले आहे. बँकिंग फसवणुकीवर एक बुकलेट जारी करताना, आरबीआयने म्हटले की, फसवणूक करणारे सामान्य लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे गायब करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत.

फसवणूक टाळण्यासाठी

अशा परिस्थितीत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे आरबीआयकडून (RBI) सांगण्यात आले आहे. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, फायनान्शिअल टेक्नॉलॉजी इकोलॉजीचा भाग बनलेले नवोदित फसवणुकीच्या जाळ्यात अगदी सहज अडकतात. रिझव्‍‌र्ह बँकेच्या हँडबुकमध्ये आर्थिक फसवणुकीसाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतींचा तपशील देण्याबरोबरच ते टाळण्याच्या पद्धतीही सांगण्यात आल्या आहेत.

RBI
SBI, HDFC अन् ICICI बँकेच्या ग्राहकांचे बल्ले-बल्ले, RBI केली मोठी घोषणा

तक्रारींचे विश्लेषण करुन हँडबुक तयार केली

हँडबुकमध्ये, बँक ग्राहकांना (Customers) आर्थिक व्यवहारादरम्यान कधीही OTP आणि CVV माहिती कोणाशीही शेअर करु नका, असेही सांगण्यात आले आहे. तक्रारींच्या विश्लेषणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या हँडबुकमध्ये आरबीआयने म्हटले की, व्यवहारादरम्यान जाणूनबुजून किंवा नकळत वैयक्तिक माहिती दिल्याने तुम्ही आर्थिक फसवणुकीला सहज बळी पडू शकता.

RBI
Inflation Rate: महागाईवर आली मोठी अपडेट, RBI गव्हर्नरने व्यक्त केली ही अपेक्षा

तसेच, कोणत्याही प्रकारचे सायबर गुन्हे टाळण्यासाठी, बँक (Bank) कार्डचा CVV किंवा डिजिटल व्यवहाराच्या वेळी जारी केलेला OTP कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांसह शेअर करु नका. RBI च्या मते, बँका, वित्तीय संस्था, RBI किंवा इतर संस्था कधीही ग्राहकांकडे गोपनीय माहिती विचारत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com