देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला RBI ने ठोठावला 1 कोटींचा दंड

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआई (SBI) ला मोठा झटका बसला आहे.
RBI imposed a fine of 1 crore on the countrys largest public sector bank
RBI imposed a fine of 1 crore on the countrys largest public sector bank Dainik Gomantak

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआई (SBI) ला मोठा झटका बसला आहे. SBI ला आरबीआय (RBI) ने 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआय (Reserve Bank of India) ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बँकेवर हा दंड ठोठावला आहे.

16 नोव्हेंबर रोजी आदेश जारी केला

RBI ने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा दंड 16 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात लावण्यात आला आहे. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, आर्थिक स्थितीच्या संदर्भात, 31 मार्च 2018 ते 31 मार्च 2019 दरम्यान SBI च्या देखरेख मूल्यांकनाबाबत एक वैधानिक निरीक्षण केले गेले.

RBI imposed a fine of 1 crore on the countrys largest public sector bank
NITI आयोगाचा डिजिटल बँकेचा प्रस्ताव

जास्त रकमेचे शेअर्स तारण

आदेशानुसार, जोखीम मूल्यांकन अहवालाची तपासणी, तपासणी अहवालात बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. SBI ने कर्जदार कंपन्यांच्या बाबतीत कंपन्यांच्या पेड-अप भाग भांडवलाच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त रकमेचे शेअर्स तारण ठेवले होते.

ग्राहकांवर काय परिणाम होईल?

यानंतर आरबीआयने याप्रकरणी एसबीआयला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकेच्या उत्तराचा विचार करून दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही तुम्हाला सांगतो की, बँकेला लावण्यात आलेल्या या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांचा पैसा आणि भांडवल पूर्णपणे सुरक्षित राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com