RBI ने OLA कंपनीवर लावला कोटींचा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण

नियामकांचे पालन न केल्यामुळे Ola Financial Services Private Limited वर 1.67 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
RBI Penalty on OLA
RBI Penalty on OLA Dainik Gomantak

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ओला या फायनान्स कंपनीला कोटींचा दंड ठोठावला आहे. RBI ने सांगितले की, नियामकांचे पालन न केल्यामुळे Ola Financial Services Private Limited वर 1.67 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय आरबीआयने यापूर्वी ओलाला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती, ज्यासाठी आरबीआयने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दंड ठोठावला आहे.

RBI Penalty on OLA
विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय गाठावे - प्रेमेंद्र शेट

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, काही प्रीपेड पेमेंट साधनांचे नियम, केवायसी नियम आणि तरतुदींचे योग्य प्रकारे पालन केले गेले नाही, त्यामुळे कंपनीवर दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट 2021 रोजी RBI ने ओला फायनान्स कंपनीवर देखील दंड ठोठावला. यापूर्वी 25 फेब्रुवारी 2016 रोजी 1,67,80,000 रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला होता.

कोणत्या कलमाखाली दंड आकारला जातो?

पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 च्या कलम 30 अंतर्गत हा दंड लावण्यात आल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. या कलमांतर्गत येणाऱ्या तरतुदींचा वापर करून RBI ने दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कारणे दाखवा नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानेच हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कंपनीचा व्यवसाय काय आहे?

ओला फायनान्शियल लिमिटेड ही ओलाची उपकंपनी आहे, जी कॅब सुविधा पुरवते. हे दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी कर्ज, वैयक्तिक कर्ज तसेच विमा उत्पादने यासारख्या आर्थिक सेवा प्रदान करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com