एचडीएफसी बँकेच्या डिजिटल प्रक्रियेवर आणि नवीन क्रेडिट देण्यावर रिझर्व बँकेने आणले निर्बंध

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

. आपली डिजिटल कार्यप्रणाली, क्रेडिट कार्ड देण्याची प्रक्रिया अघोषित कालावधीसाठी थांबवण्याचे आदेश रिझर्व बँकेने दिले आहेत.

नवी दिल्ली- खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेवर रिझर्व बँकेने अमर्यादित कालावधीसाठी निर्बंध आणले आहेत. आपली डिजिटल कार्यप्रणाली, क्रेडिट कार्ड देण्याची प्रक्रिया अघोषित कालावधीसाठी थांबवण्याचे आदेश रिझर्व बँकेने दिले आहेत. एचडीएफसीच्या डेटा सेंटरमधील अनियमिततेमुळे हे निर्बंध आणण्यात आले आहेत. एचडीएफसी बँकेने शेअर बाजारला ही माहिती दिली आहे. 

एचडीएफसी बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आरबीआयने एचडीएफसी बँक लिमिटेडला २ डिसेंबर २०२०  रोजी एक आदेश दिला असून मागील २ वर्षांपासून बँकेच्या इंटरनेट बँकिंग/ पेमेंट बँकिंग/ मोबाईल बँकिंगमध्ये आलेल्या अडचणींचा समावेश आहे. २१ नोव्हेंबर २०२० ला प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने बँकेची इंटरनेट बँकिंग सुविधा बंद होणे आदि गोष्टी घडल्या.
 
बँकेतील त्रुटींबाबत तपास करण्याचे आदेश

 आरबीआयने आदेशात बँकेला आपला कार्यक्रम डिजिटल 2.0 आणि अन्य प्रस्तावित आयटी प्रयोगांच्या आधारे आपली डिजिटल व्यापार प्रक्रिया आणि नवीन क्रेडिट कार्डची सोर्सिंस थांबवावी असा सल्ला दिला आहे. याबरोबरच त्यांनी बँकेच्या संचालक मंडळाला बँकेतील त्रुटींचा तपास करून उत्तर द्यावे. मागील दोन वर्षांपासून बँकेने आपली आयटी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अनेक पावले उचचली आणि उर्वरीत कामही याच वेगाने पूर्ण केले जाईल असे  एचडीएफसी बँकेकडून सांगण्यात आले.
 
एचडीएफसी बँकेने म्हटलंय की, डिजिटल बँकिंग चॅनल्समधील अडचणींवर मात कऱण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी आताच्या क्रेडिट कार्ड, डिजिटल बँकिंग चॅनल्स आणि परिचालनावर या आदेशाचा काहीही प्रभाव होणार नाही. या निर्णयानंतरही त्यांच्या व्यवसायावरही कोणताही परिणाम होणार नसल्याचा आशावाद बँकेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 

संबंधित बातम्या