RBI ची मोठी घोषणा; कोरोनाविरोधी लढ्याला मिळणार बळ

 RBIs big announcement The anti Corona fight will gain strength
RBIs big announcement The anti Corona fight will gain strength

देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेतून देश आणि अर्थव्यवस्था सावरत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा तडाखा दिला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा निर्बंध, लॉकडाऊन (Lockdown) लावण्यासारखी पावलं उचलंली जात असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक परिस्थिती अचानक मोठे बदल झाले आहेत. देशापुढील संभाव्य आर्थिक धोका लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅंकेनं (RBI) आघाडीवर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी घोषणा केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक परिस्थितीमध्ये मोठे बदल वेगाने घडत आहेत. पूर्वपदावर येत असलेल्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिणाम झाले असल्याची कबुली देत रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. आरबीआय सर्व परिस्थीवर नजर ठेवून असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात मोठी पावलं उचलण्याची गरज आहे. पुढील काळामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असल्यानं ग्रामीण भागातील मागणी वाढण्याची आशा आहे, असंही दास यांनी म्हणाले.  (RBIs big announcement The anti Corona fight will gain strength)

1आरबीआय लसींसाठी आणि रुग्णालयातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अतिरिक्त कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. हे देण्यात येणारं कर्ज कोविड लोन बुक प्रमाणे देण्यात येणार आहे. आणि सुविधा पुढील वर्षापर्यंत राहणार आहे.


2 देशातील आरोग्य व्यवस्थेसाठी रिझर्व्ह बॅंकेनं 50 कोटी रुपये निधीची घोषणा केली. यासाठी रेपो दरानुसार हा निधी पुढच्या तीन वर्षासाठी उपलब्ध होईल. या विशेष नव्या खिडकीची सुविधा 31 मार्च 2022 पर्यंत सुरु राहणार असल्याचे दास यांनी स्पष्ट केले.

3 रिझर्व्ह बॅंक खुल्या बाजारामधून 35 हजार कोटींचे सरकारी रोखे खरेदी करणार आहे. 20 मे रोजी G-SAP 1.0 अंतर्गत आता रोख्यांची खरेदी करण्यात येणार आहे.

4 राज्यांना कोरोनाच्य़ा दुसऱ्या लाटेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशा राज्यांना रिझर्व्ह बॅंकेनं मोठा दिलासा दिला आहे. राज्यांची ओव्हरड्राफ्टची सुविधा 36 दिवसांऐवजी 50 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या सुविधेचा लाभ राज्यांना घेता येणार आहे, अशी माहिती गव्हर्नर दास यांनी दिली.

5 सूक्ष्म आणि लघु व्यवसायिकांसाठी आरबीआय कर्ज उपलब्ध देण्याची सुविधा देणार आहे. आरबीआयने पुन्हा एकदा एक वेळसाठी कर्ज पुनर्चनेचा पर्याय उपलब्ध दिला आहे. वैयक्तिक कर्जदार, लघु उद्योजकांना याचा लाभ घेता येणार आहे.

6 देशातील नागरिकांना बॅंकिग व्यवहार करताना समस्यांना सामोरं जाऊ नये यासाठी रिझर्व्ह बॅंकेनं विविध श्रेणीत व्हिडिओद्वारे केवायसी प्रक्रिया तय़ार केली आहे. यामुळे लोकांना व्यवहार करणं शक्य होणार आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com