RBIचा मोठा निर्णय; आता सुट्टीच्या दिवशीही खात्यात होणार पगार जमा!

RBI 1.jpg
RBI 1.jpg

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना सरकारी किंवा खासगी अशा दोन्ही ठिकाणी महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये पगार जमा होतात. मात्र पगार कधीकधी जमा होण्याच्या ठरलेल्या तारखेच्या दिवशीच वीकेंड किंवा सणासुदीची सुट्टी येते आणि पगार जमा लांबतं. मात्र येत्या 1 ऑगस्टपासून आठवड्यामधील कोणत्याही दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी देखील पेन्शन, पगार, व्याज, डिव्हिडंड आपल्या खात्यात जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. RBI ने यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. यानुसार आता नॅशनल ऑटोमेटेड क्लिंअरिंग हाऊस अर्थात NACH ची सुविधा देखील आठवड्याच्या सातही दिवशी आणि वर्षातील 365 दिवस उपलब्ध राहणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. (RBIs big decision Now the salary will be credited to the account even on holidays)

या प्रकारच्या ट्रान्सफरला होणार फायदा?

RBI ने आपल्या परिपत्रकात म्हटल्यानुसार, सध्याच्या कोरोना काळात सरकारी अनुदाने किंवा खूप जास्त खात्यांमध्ये एकाचवेळी ट्रान्सफर करण्याची रक्कम असो, त्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर(DBT) साठी NACH लाच सर्वाधिक पसंती मिळते आहे. डिव्हिंडड, व्याज, पगार, व्याज, वीजबीलाची रक्कम, पेन्शन टेलिफोन, पाण्याची बिलं जमा करणं किंवा कर्जावरील व्याज म्युच्युअल फंड विम्याचे हफ्ते यासाठी बेनिफिट ट्रान्सफर सुविधेचा वापर केला जातो.

1ऑगस्टपासून मिळणार सुविधा!

सध्या NACH ची सुविधा केवळ बॅंक सुरु असते त्यावेळीच दिली जाते. बॅंकेच्या सुट्टीच्या दिवशी ही सुविधा उपल्बध नसते. मात्र येत्या 1 ऑगस्टपासून ही सुविधा आठवड्याचे सर्व दिवस सुरु राहणार आहे. आता आठवड्याच्या सर्व दिवशी  RTGSदिवशी  उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या आधारे ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

''RBIद्वारा घेतलेला हा निर्णय खूप महत्वाचा मानला जात आहे.  यामुळे लाखो लोकांना पेन्शन, पगार, किंवा स्कॉलरशिप , सरकारी अनुदाने मिळण्यामध्ये फायदा होणार नसून अनेक मोठ्या कंपन्याना देखील बल्ब पेमेंट करण्यासाठी याचा फायदा होणार आहे,'' अशी प्रतिक्रिया रघुवर गखार (Raghuvar Gakhar) यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com