केंद्र सरकार दोन हजार रुपयांची नोट बंद करणार? जाणून घ्या खरं काय ते

केंद्र सरकार दोन हजार रुपयांची नोट बंद करणार? जाणून घ्या खरं काय ते
2000

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीचा निर्णय घेतला होता. व त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून गेल्यानंतर सरकारने नविन 500 व 2000 रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. यासह सरकारने दहा, वीस, पन्नास व शंभर रुपयांच्या नविन नोटा देखील सरकारने आणल्या होत्या. मात्र त्यानंतर बऱ्याचदा 2000 रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्यात येणार असल्याच्या अफवा अनेकदा उठल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु आता सरकारने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सरकारने लोकसभेत गेल्या दोन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली गेली नाही व त्यांची संख्या पूर्वीपेक्षा खाली आली असल्याची माहिती दिली आहे. 

वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात 30 मार्च 2018 रोजी 2000 रुपयांच्या 336.2 कोटी नोटा चलनात होत्या. तर 26 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांची संख्या घटून 249.9 कोटींवर आली असल्याचे सांगितले. तसेच, सार्वजनिक व्यवहारांची मागणी पूर्ण करण्यासाठी आरबीआयच्या सल्ल्यानुसार कोणत्याही किमतींच्या नोटा छापण्याचा निर्णय घेण्यात येण्यात असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. व 2019-20 आणि 2020-21 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईची ऑर्डर देण्यात आली नसल्याचे अनुराग ठाकूर यांनी पुढे नमूद केले. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये 2016-17 (एप्रिल 2016 ते मार्च 2017) या आर्थिक वर्षात 354.2991 कोटी नोटा छापल्या असल्याचे म्हटले होते.   तथापि, 2017-18 मध्ये केवळ 11.1507 कोटीच्या नोटा छापल्या गेल्या. 2018-19 मध्ये 4.669 करोड आणि एप्रिल 2019 पासून एकही नोटा छापली गेली नसल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले होते. परंतु सरकारने आज 2000 रुपयांची नोट बंद करण्यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे 2000 रुपयांची पूर्वीप्रमाणेच चालू राहणार आहे.


 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com