पेट्रोल-डिझेलची रेकॉर्डब्रेक वाटचाल सुरूच; अनेक शहरांमध्ये शंभरीपार

पेट्रोल-डिझेलची रेकॉर्डब्रेक वाटचाल सुरूच; अनेक शहरांमध्ये शंभरीपार
The record breaking journey of petrol diesel prices continues Hundreds crossed in many cities

वी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्या गेल्या एका आठवड्यात इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ करीत आहेत. आजच्या वाढीनंतर इंधनाचे दर देशातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ आणि महाराष्ट्रातील परभणी शहरात एक्सपी पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे, तर बर्‍याच शहरांमध्ये ती प्रतिलिटर 100 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. सरकारने मात्र पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात त्यांचे दर खाली येण्याची शक्यता नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलामध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून आली. सोमवारी लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये व्यापार सुरू असताना डब्ल्यूटीआय क्रूड 0.69 डॉलर वाढून 60.16 डॉलर प्रति बॅरल झाला. ब्रेंट क्रूडची किंमतही वेगाने वाढत आहे. तो प्रति बॅरल 0.87 डॉलर वाढून $ 63.30 डॉलर प्रति बॅरल झाला.

देशातल्या मुख्य शहरांमधील पेट्रोलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 89.29 रुपये आणि डीजल 79.70 रुपये प्रति लीटर
  • मुंबईमध्ये पेट्रोल 95.75 रुपये आणि डीजल 86.72 रुपये प्रति लीटर
  • कोलकाता पेट्रोल 90.54 रुपये आणि डीजल 83.29 रुपये प्रति लीटर
  • चेन्नईत पेट्रोल 91.45 रुपये आणि डीजल 84.77 रुपये प्रति लीटर
  • बंगळुरुत पेट्रोल 92.88 रुपये आणि डीजल 84.49 रुपये प्रति लीटर
  • भोपाळमध्ये पेट्रोल 97.27 रुपये आणि डीजल 87.88 रुपये प्रति लीटर
  • नोएडात पेट्रोल 87.93 रुपये आणि डीजल 80.13 रुपये प्रति लीटर
  • चंडीगढ़मध्ये पेट्रोल 85.93 रुपये आणि डीजल 79.40 रुपये प्रति लीटर
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com