जूनमध्ये स्मार्टफोन आयातीचा उच्चांक

PTI
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

ग्राहकांच्या मागणीमुळे सहापट उलाढाल वाढली

नवी दिल्ली

जून महिन्यात स्मार्टफोनच्या आयातीने उच्चांक प्रस्थापित केला आहे. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक सुमारे २२२५.२ कोटी रुपयांची उलाढाल एका महिन्यात झाली. ही उलाढाल मागील महिन्याच्या सहा पट अधिक आहे. लॉकडाउनच्या उत्तरार्धात कोविड-१९ मुळे लागू केलेले निर्बंध या काळात काही प्रमाणात शिथिल झाल्याने स्मार्टफोनची विक्री वाढल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
स्माटफोन बाजारातील तज्ञांच्या मते, जुलै महिन्यातही स्मार्टफोन आयातीत वाढ होऊ शकते. तत्पूर्वी जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयातीतबाबत नियम कडक असल्याने जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या चीनच्या झिओमी, विवो, ओप्पो आणि रिअलमी सारख्या दिग्गज कंपन्यांना जबर फटका बसला. नुकत्याच संपलेल्या तिमाहीच्या अहवालातून स्मार्टफोन कंपन्यांना उत्पादन निर्मिती आणि आयातीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे तज्ञ तरुण पाठक यांनी म्हटले आहे.
चाळीस दिवसांच्या लॉकडाउन काळात स्मार्टफोनचे उत्पादन संपूर्णपणे बंद होते. मात्र मे महिन्यात अनलॉक-१ सुरू झाल्याने आणि सरकारकडून ३० टक्के मनुष्यबळावर कारखान्यांना काम सुरू करण्याची परवानगी दिली. यादरम्यान आयातीला धक्के बसले. लॉकडाउनचे राज्यनिहाय असणारे वेगळे नियम, वितरणासंदर्भातील मुद्दे, गावी गेलेले मजूर, कोविड-१९ मुळे थांबलेले उत्पादन आणि चिनी कंपन्यांबाहेर कामगारांचे आंदोलन यामुळेही स्मार्टफोन उद्योगावर परिणाम झाला. मात्र मागणीत वाढ होत असल्याने कंपन्यांना उत्पादन सुरू करणे भाग पाडले आणि यादरम्यान चीनच्या कंपनीने उत्पादन अगोदरपासूनच वाढवले. उद्योगाच्या मते, विकले गेलेल्या एकूण स्मार्टफोनपैकी ९५ टक्के स्मार्टफोन विकले गेले आणि त्याची जुळणी कोविड-१९ ची परिस्थिती उदभवण्यापूर्वीच करण्यात आली होती. परंतु आता स्थितीत सुधारणा होत असल्याने येत्या काही महिन्यात आयातीचे प्रमाण वाढतच राहिल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या