तेल, गॅस क्षेत्राच्या पोलाद गरजांसाठी आयातीवरील अवलंबत्व कमी करणार

Pib
बुधवार, 17 जून 2020

ते म्हणाले की, देशांतर्गत सर्व गरजा पूर्ण केल्यावरच भारतीय पोलाद  क्षेत्र जागतिक स्तरावर एक प्रमुख क्षेत्र बनू शकते.

मुंबई,

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशांतर्गत पोलादाचा वापर वाढवण्यावर आणि तेल आणि गॅस क्षेत्राच्या पोलाद गरजा भागविण्यासाठी आयातीवरील अवलंबत्व कमी करण्यावर भर दिला आहे. आज नवी दिल्लीत ‘आत्मनिर्भर भारत: तेल आणि वायू क्षेत्रात देशांतर्गत पोलादाचा वापर वाढवणे ’ या विषयावरील वेबिनारला संबोधित करताना ते म्हणाले की,पोलाद आणि तेल आणि वायू क्षेत्रांचा जवळचा संबंध  असून,  त्यांना  एक नवा आधार देण्याची वेळ आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आवाहनाचा संदर्भ देताना प्रधान म्हणाले की,  आत्मनिर्भर भारत एक मजबूत उत्पादन क्षेत्र असलेला  स्वयंपूर्ण मात्र तरीही जागतिक दृष्ट्या एकात्मिक अर्थव्यवस्था असलेला बलवान भारत आहे. बांधकाम, तेल आणि वायू, वाहन उद्योग , यंत्रसामग्री यांसारख्या क्षेत्रांशी मजबूत संबंध असल्यामुळे भारतीय पोलाद क्षेत्र आत्मनिर्भर भारत बनण्याचे स्वप्न साकार करण्यात मूलभूत भूमिका बजावू शकतो. 

संबंधित बातम्या