JIOकडून ग्राहकांना 'हॅपी न्यु इयर'; १ जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कवर कॉल्स मोफत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

१ जानेवारीपासून देशभरात जियो वरून कोणत्याही नेटवर्कवर फोन करण्यासाठी कोणतेही शुल्क कंपनी घेणार नाही. आम्ही व्हाईस कॉल्सचे शुल्क शुन्यावर आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे जियोकडून सांगण्यात आले.

नवी दिल्ली- रिलायंसने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच ग्राहकांना एक चांगली बातमी दिली आहे. रिलायंस इन्फोकॉने  १ जानेवारीपासून इंटरकनेक्टेड युसेज चार्जेस न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच १ जानेवारीपासून देशभरात जियो वरून कोणत्याही नेटवर्कवर फोन करण्यासाठी कोणतेही शुल्क कंपनी घेणार नाही. आम्ही व्हाईस कॉल्सचे शुल्क शुन्यावर आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे जियोकडून सांगण्यात आले. आईयुसी चार्जेस संपवल्यानंतर डोमेस्टीक व्हाईस  कॉल्स  फ्री करण्यात येणार आहेत. १ जानेवारीपासून परत सर्व कॉल्स फ्री करण्यात येणार असून जियो टू जियो व्हाईस कॉल्स याआधीच फ्री होते. 

कॉल करण्यासाठी नाही लागणार पैसे- 

रिलायंस जियोने केलेल्या या घोषणेनंतर आता जियोवरून कोणत्याही नेटवर्कवर फोन करण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. देशभरातील कोणत्याही भागात ही सुविधा लागू असेल. सद्यस्थितीत, आईयुसी व्यवस्थेमुळे ग्राहकांना  ऑफ-नेट  व्हाईस कॉल्ससाठी पैसे द्यावे लागत होते. 

सप्टेंबर २०१९ मध्ये टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने मोबाईल-टू-मोबाईल कॉल्ससाठी आईयुसीला जानेवारी २०२० पर्यंत पुढे ढकलले होते. यानंतर जियोने आपल्या ग्राहकांकडून ऑफ-नेट-व्हाईस कॉल्ससाठी शुल्क आकारणे सुरू केले होते. मात्र, जियोकडून घेतले जाणारे हे शुल्क आईयुसी शुल्काएवढेच होते.  ऑन-नेट डोमेस्टिक कॉल्स जियो नेटवर्कवर अजून फ्री असल्याचेही कंपनीकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. VoLTE सारख्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा लाभ भारतातील सामान्या नागरिकांना घेता यावा, यासाठी जियो कटिबद्ध असल्याचेही सांगण्यात आले.    

 

संबंधित बातम्या