Reliance AGM: स्वस्त दरातील JIO 5G फोनची होऊ शकते घोषणा

Reliance AGM: स्वस्त दरातील JIO 5G फोनची होऊ शकते घोषणा
Reliance 5g

आज होणार असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (AGM) कंपनी बर्‍याच मोठ्या घोषणा करणार आहे. यावेळी या एजीएममधील बर्‍याच मोठ्या घोषणांच्या कंपनीकडून अपेक्षा आहे. त्यामध्ये 5 जी सेवा आणि स्वस्त 5 जी फोन इ. विषयांवर निर्णय घेतले जाउ शकतात. (Reliance Jio may announce 5G phone in Annual general meeting today)

रिलायन्स आज वार्षिक सर्वसाधारण सभेत 5 जी सेवा सुरू करण्याची घोषणा करू शकते. या व्यतिरिक्त अगदी परवडणारी Jio फोन 5G ची सुद्धा घोषणा करू शकते.  मात्र यावर्षी देशात 5G सुरू होण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स बऱयाच दिवसांपासून याची तयारी करत आहे. रिलायन्स जिओने आपल्या 5 जी स्मार्टफोनसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी Google सोबत भागीदारी केली आहे.

सध्या बाजारात उपलब्ध 5 जी फोनची किंमत 16000 रुपयांच्या वर आहे.  त्यामुळे  अशी अपेक्षा आहे की, रिलायन्स कमी किमतीत 5 जी फोन ऑफर करेल जेणेकरून या फोनवर शिफ्ट होउ शकतील. आज रिलायन्स कमी किमतीच्या लॅपटॉपची देखील ऑफर देण्याची शक्यता आहे. या लॅपटॉपचे नाव जिओबुक असू शकते. गेल्या सर्व साधारण सभेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 5 जी स्पेक्ट्रम (5 जी स्पेक्ट्रम) आधारित सोल्यूशन्स सादर केली होती. कंपनीने असे म्हटले होते की ते अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम बनवेल. तसेच ही सिस्टीम गुगलच्या सहकार्याने बनवण्याची त्यांची योजना आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com