मुकेश अंबांनींचं आजारपण!; कंपनीच्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांनी घसरण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

सोमवारी सकाळी शेअर 7 टक्क्यांनी घसरुन 1940 रुपयांपर्यंत पोहोचले होते. चार महिन्यातील हा सर्वात कमी स्तर आहे. 23 ऑक्टोबरपासून आतापर्यंत कंपनीचा मार्कट कॅप 1 लाख करोड रुपये घटला आहे.

मुंबई-  रिलायन्स इंडस्ट्रीज या अग्रगण्य कंपनीच्या शेअर्समध्ये  ७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. शेअर्सची किंमत कमी होऊन ती १९०० रूपयांपेक्षा खाली गेली आहे. कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची प्रकृती ढासळल्याने ही घसरण झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी RIL ने कोणतेही वक्तव्य करणे टाळले आहे.     

आज मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये 1 लाख करोड रुपयांची कमी आली आहे. ही घट 13.89 लाख कोटी रुपयांवरुन 12.90 लाख कोटींपर्यंत आली आहे. एका आठवड्यात 1.36 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. याआधी मे महिन्यामध्ये एका दिवसात शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घट झाली होती. या बातमीनंतर मॅक्वायरीने आरआयएलच्या शेअरमध्ये 42 टक्क्यांच्या घसरणीची रेंटिग दिली आहे. ब्रोकरेज हाऊसने म्हटलं की, शेअर्स अंडर परफॉर्म करतील आणि पुढे शेअर्सची किंमत 1,195 होऊ शकते. 

सोशल मीडियावर अंबानींच्या आजाराची चर्चा 

गेल्या 15 दिवसांपासून मुकेश अंबानी आजारी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अंबानी यांचे लंडनमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यात आले आहे. त्यांचे वजन 30 किलोंनी घटले आहे. अंबानी परिवार आयपीएलमध्ये दिसत नसल्याची चर्चाही सोशल मीडियामध्ये होत आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी जेष्ठ वकील हरीश साळवे यांच्या लग्नामध्ये मुकेश अंबानी यांनी वेबिनारच्या माध्यमातून उपस्थिती लावली होती. 
काही ठोस माहिती मिळेपर्यंत यावर काही प्रतिक्रिया देण्यास ब्रोकरेज हाऊसनी नकार दिला आहे. पण, या बातमीचे पडसाद आज शेअर मार्केटवर दिसले. काही ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की फ्यूचर रिटेलसोबतचा करार आणि शनिवारी कंपनीने दाखवलेला खराब रिझल्ट यामुळे शेअरमध्ये हालचाल दिसली. पण, काहींचे म्हणणे आहे की रिझल्ट इतका खराब नाही की 7 टक्क्यांची घसरण होईल. यामागे दुसरे कारण आहे. 

सोमवारी सकाळी शेअर 7 टक्क्यांनी घसरुन 1940 रुपयांपर्यंत पोहोचले होते. चार महिन्यातील हा सर्वात कमी स्तर आहे. 23 ऑक्टोबरपासून आतापर्यंत कंपनीचा मार्कट कॅप 1 लाख करोड रुपये घटला आहे. 

संबंधित बातम्या