'रेपो' आणि 'रिव्हर्स रेपो रेट'मध्ये कोणताही बदल नाही ; पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेचा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 डिसेंबर 2020

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या डिसेंबरच्या पतधोरण आढावा बैठकीत मुख्य व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. किरकोळ महागाईच्या उच्च स्तराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई, ता. ४  ः रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या डिसेंबरच्या पतधोरण आढावा बैठकीत मुख्य व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. किरकोळ महागाईच्या उच्च स्तराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. रेपो रेट ४ टक्के, रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के, रोख राखीव प्रमाण ३ टक्के आणि एमएसएफ रेट आणि बँक रेट ४.२५ टक्के या पातळीवर कायम राहतील. दास म्हणाले, की ‘एमपीसी’च्या सर्व सदस्यांनी एकमताने रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आवश्यकतेनुसार पतधोरणाची भूमिका कायम ठेवली जाईल, असा निर्णयही घेण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या