Income Tax: 'या' राज्यात राहणाऱ्या लोकांना भरावा लागत नाही आयकर, जाणून घ्या कारण

Income Tax: इन्कम टॅक्स रिटर्नची तारीख लवकरच येणार आहे. आयकराच्या कक्षेत येणाऱ्या देशातील प्रत्येक नागरिकाला कर भरावा लागतो.
Income Tax
Income TaxDainik Gomantak

Income Tax: इन्कम टॅक्स रिटर्नची तारीख लवकरच येणार आहे. आयकराच्या कक्षेत येणाऱ्या देशातील प्रत्येक नागरिकाला कर भरावा लागतो.

अधिनियम, 1961 अंतर्गत प्राप्तिकराची तरतूद करण्यात आली आहे. पण तुम्हाला देशातील अशा राज्याबद्दल माहिती आहे का, जिथे राहणाऱ्या लोकांना कर भरावा लागत नाही. ही कोणते राज्ये आहे आणि येथील लोक कर का भरत नाहीत हे जाणून घेऊया...

दरम्यान, भारतातील या एकमेव राज्याचे नाव सिक्कीम (Sikkim) आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 372(एफ) नुसार, सिक्कीममध्ये राहणाऱ्या लोकांना टॅक्स स्लॅबच्या बाहेर ठेवले जाते. या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया...

Income Tax
Income Tax Recruitment 2023: आयकर विभागात नोकरीची उत्तम संधी; 'या' पदांसाठी भरती सुरु

सिक्कीमचे लोक कर का भरत नाहीत?

सिक्कीम 1975 मध्ये भारतात (India) विलीन झाले. सिक्कीम हे पूर्वीप्रमाणेच जुना कायदा आणि विशेष दर्जा कायम ठेवण्यात येणार या अटीसह भारताचा भाग बनले.

त्यावेळी भारत सरकारने ही अट मान्य केली होती. म्हणून, सिक्कीमचे स्वतःचे स्वतंत्र कर नियम आहेत, जे 1948 मध्ये बनवले गेले.

सिक्कीम इन्कम टॅक्स मॅन्युअल 1948 अंतर्गत, सिक्कीममध्ये राहणाऱ्या कोणत्याही रहिवाशांना भारत सरकारला कर भरावा लागत नाही.

Income Tax
Income Tax: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, आता 'या' लोकांना मिळणार कर सवलतीचा लाभ!

2008 मध्ये संपूर्ण सूट मिळाली

2008 मध्ये सिक्कीमच्या लोकांना करातून पूर्णपणे सूट देण्यात आली होती. सिक्कीममधून आवश्यक कर कायदेही काढून टाकण्यात आले.

आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायद्यात एक वेगळे कलम 10 (26AAA) जोडण्यात आले. या कायद्यानुसार सिक्कीममधील रहिवाशांना भारत सरकारला कर भरावा लागणार नाही.

त्यात कलम 371 (एफ) देखील जोडण्यात आले, जे सिक्कीमच्या लोकांना मिळालेल्या विशेष दर्जाला घटनात्मक संरक्षण देते. यासोबतच भारत सरकारने सिक्कीममधील 94 टक्के लोकांना करात सूट दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com