
Retail Inflation in April 2023: एप्रिल महिन्यात सर्वसामान्यांना महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यात महागाईचा दर कमी झाला आहे.
स्वस्त खाद्यपदार्थांमुळे एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 18 महिन्यांच्या नीचांकी 4.7 टक्क्यांवर आला. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, हा सलग दुसरा महिना आहे, जेव्हा ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई (Inflation) (CPI DATA) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या समाधानकारक मर्यादेत आहे. महागाई दर 2 टक्क्यांच्या फरकासह 4 टक्के ठेवण्याची जबाबदारी आरबीआयकडे आहे.
आकडेवारीनुसार, CPI-आधारित किरकोळ चलनवाढ या वर्षी मार्चमध्ये 5.66 टक्के होती आणि वर्षभरापूर्वी एप्रिलमध्ये 7.79 टक्के होती.
एप्रिल महिन्यातील किरकोळ चलनवाढीचा दर ऑक्टोबर 2021 नंतर नीचांकी पातळीवर आहे. त्यावेळी तो 4.48 टक्के होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार, एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 3.84 टक्के होता, जो मार्चमध्ये 4.79 टक्के होता. एक वर्षापूर्वी एप्रिल महिन्यात हे प्रमाण 8.31 टक्के होते.
तृणधान्ये, दूध आणि फळे इत्यादींच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई डिसेंबर 2022 मध्ये 5.7 टक्क्यांवरुन यावर्षी फेब्रुवारीमध्ये 6.4 टक्क्यांवर पोहोचली. रिझर्व्ह बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 5.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
एप्रिलमध्ये अन्नधान्य आणि संबंधित उत्पादनांचा महागाई दर 13.67 टक्के होता, जो मार्चमध्ये 15.27 टक्के होता. याशिवाय, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महागाई दर 8.85 टक्के आहे, जो मार्चमध्ये 9.31 टक्के होता.
मसाल्यांच्या महागाईचा दर 17.43 टक्के आहे. पालेभाज्या-भाज्यांचा महागाई दर -6.50 टक्के, डाळींचा भाव 5.28 टक्के, मांस आणि माशांचा महागाई दर -1.23 टक्के, तेल आणि फॅट्सचा महागाई दर -12.33 टक्के राहिला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.