लॉकडाऊन काळातही देशात 136 लोकांची संपत्ती 100 कोटी पार

भारतात 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. अशा मालमत्तेचे एकूण एकूण उत्पन्न असलेल्या व्यक्तींची संख्या 2020-21 मध्ये 136 इतकी झाली आहे (Multimillionaire In India)
Multimillionaire In India
Multimillionaire In IndiaDainik Gomantak

भारतात (India) 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. अशा मालमत्तेचे एकूण एकूण उत्पन्न असलेल्या व्यक्तींची संख्या 2020-21 मध्ये 136 इतकी झाली आहे (Multimillionaire In India). 2019-20 मध्ये अशा लोकांची संख्या 141 आणि 2018-19 मध्ये 77 होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी राज्यसभेत (Rajyasabha) सांगितले की, गेल्या 3 वर्षात आयकर विभागाकडे (Income Tax Department) दाखल केलेल्या आयकर विवरणपत्रात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न उघड केलेल्या व्यक्तींची संख्या 2020-21 मध्ये 136 इतकी आहे. (Reverse lockdown effect: 136 people still multimillionaire amid pandemic)

त्यांना विचारण्यात आले की लॉकडाऊन दरम्यान देशातील अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली आहे हे खरे आहे का? अर्थमंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे उपलब्ध माहितीनुसार प्रत्यक्ष करांतर्गत ट्रिलियनेअर या शब्दाची विधायी किंवा प्रशासकीय व्याख्या नाही.त्यामळे असा एकदा देता नाही येणार पण यात नक्कीच वाढ झाली आहे.

Multimillionaire In India
एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खाते असेल तर, ही बातमी एकदा वाचा

पुढे अर्थमंत्री म्हणाल्या की एप्रिल 2016 मध्ये संपत्ती कर रद्द करण्यात आला असल्याने,केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाक वैयक्तिक करदात्याच्या पूर्ण संपत्तीबद्दल कोणतीही माहिती ठेवत नाही. त्या म्हणाल्या की, सांख्यिकी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयानेकेलेल्या घरगुती ग्राहक खर्चावरील सर्वेक्षणावर आधारीत देशात सध्या गरीबीचा अधिकृत अंदाज आहे.

अर्थमंत्र्यांच्या विधानानुसार सध्याच्या तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या 27 कोटी इतकी होती. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सरकारने 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' वर भर देऊन विविध योजना सुरू केल्या आहेत ज्याचा उद्देश लोकांचे जीवनमान सुधारणे हाच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com