तुम्ही 'एसबीआय'चे ग्राहक आहात? मग बदललेले नियम वाचा सविस्तर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

सध्या लोक डिजिटल माध्यमातून व्यवहार करण्यास पसंती दर्शवतात. अनेकदा ग्राहकांना नेटवर्कमुळे व्यवहार करताना अडचणींचा सामनादेखील करावा लागतो.

नवी दिल्ली : सध्या लोक डिजिटल माध्यमातून व्यवहार करण्यास पसंती दर्शवतात. अनेकदा ग्राहकांना नेटवर्कमुळे व्यवहार करताना अडचणींचा सामनादेखील करावा लागतो.एसबीआय ग्राहकांसाठी कार्डने व्यवहार करणाचे किंवा एटीएम मधून पैसे काढण्याचे नियम बदलण्यात आले आहेत. पण यामुळे ग्राहकांच आर्थिक नुकसान होऊ शकते. भारतातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने नियमांमध्ये बदल केले आहेत. ग्राहकांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर व्यवहार केल्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त दंड आकारण्यात येणार आहे. जर ग्राहकांच्या खात्यात शिल्लक रक्कम नसेल, तर त्यासाठी 20 रुपये आणि जीएसटी वसूल करण्यात येणार आहे.

एलपीजी सिलिंडरची किंमत वाढणार; सबसिडी बंद करण्यासाठी सरकारच्या उपाययोजना

बँक नॉन फायनान्शियल ट्रान्जॅक्शन केल्यानंतरही बँक चार्ज लावणार आहे. त्यासोबत ग्राहक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करत असेल, तर अधिकच्या व्यवहारांसाठी बँकेकडून 10 ते 20 रुपयांदरम्यान आणि जीएसटी शुल्क आकारण्यात येईल. एसबीआयमधून एका महिन्यात आठ वेळा सेव्हिंग खातेधारकांना ही सुविधा मोफत करता येणार आहे, यामध्ये पाच वेळा बँकेच्या एटीएममधून आणि तीन वेळा इतर बँकांच्या एटीएममधून आर्थिक व्यवहार करू शकतात. शहरांमध्ये दहा वेळा पैसे काढणे-भरणे याची मोफत सुविधा आहे. यातील पाच वेळा एसबीआय मधून तर इतर पाच वेळा दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून ग्राहक पैसे काढू शकतात.

पेटीएम वापरकर्त्यांना झटका! क्रेडिट कार्डमधून पैसे ट्रान्सफर करणे महागले

एसबीआयच्या एटीएममधून 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर त्यासाठी ओटीपी बंधनकारक आहे. बँकेने ग्राहकांना अधिकची सुरक्षा ओटीपीची सुविधा दिली आहे. एसबीआय बँकेचे सर्व एटीएम केंद्र 24 तास उपलब्ध आहेत. एसबीआय बँकेने 1 जानेवारी 2020 पासून ओटीपी आधारित सेवा सुरु केली आहे. ग्राहक पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये येतो, त्यावेळी त्याला ओटीपी विचारला जातो, हा ओटीपी ग्राहकाच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जातो, ओटीपी आधारित पैसे काढण्याची सुविधा एसबीआय एटीएममध्ये उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या