
Savitri Jindal: भारताच्या सावित्री जिंदाल या आशियातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांनी चीनच्या यांग हुआन यांना मागे टाकले आहे. चीनमधील मालमत्तेच्या संकटामुळे हुआयान यांची कंपनी कंट्री गार्डन होल्डिंगसह देशातील विकासकांवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, ब्लूमबर्गच्या इंडेक्समध्ये, सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती $11.3 अब्ज आहे. धातू आणि वीज निर्मितीसारख्या व्यवसायांमध्ये जिंदाल ग्रुपचा दबदबा आहे. तथापि, जानेवारीच्या तुलनेत जुलैमध्ये सावित्री जिंदाल यांच्या मालमत्तेत मोठी घट झाली आहे.
दुसरीकडे, 72 वर्षीय सावित्री जिंदाल या भारतातील (India) सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. तसेच 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या देशातील 10व्या श्रीमंत व्यक्ती आहेत. 2005 मध्ये त्यांचे पती आणि जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओपी जिंदाल यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर सावित्री जिंदाल यांनी जिंदाल समूहाची सूत्रे हाती घेतली. ही कंपनी देशातील स्टील क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. त्याचबरोबर सिमेंट, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत आहे.
तसेच, अलिकडच्या वर्षांत सावित्री जिंदाल (Savitri Jindal) यांच्या संपत्तीत प्रचंड चढ-उतार झाले. कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) प्रारंभी एप्रिल 2020 मध्ये त्यांची संपत्ती 3.2 अब्ज डॉलर एवढी होती. त्यानंतर रशियाच्या (Russia) युक्रेनवरील (Ukraine) आक्रमणानंतर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे एप्रिल 2022 मध्ये त्यांची संपत्तीत प्रचंड वाढ झाली.
त्याच वेळी, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या यांग हुआन यांची संपत्ती जानेवारीमधील 23.7 अब्ज डॉलरवरुन जुलैमध्ये 11 अब्ज डॉलरवर पोहोचली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.