एसबीआय बँकने अदानी गृपला कर्ज देण्यास हात मागे घेतला

SBI Bank refuses to lend Loan to Adani Group for controversial coal mining project
SBI Bank refuses to lend Loan to Adani Group for controversial coal mining project

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने(SBI Bank ) वादग्रस्त कोळसा खाणीच्या प्रोजेक्टसाठी अदानी गृपला(Adani Group) कर्ज देण्यासाठी हात मागे घेतले आहे. गुंतवणूकदार, पर्यावरणतज्ज्ञ आणि ब्लॅकरॉक इत्यादींच्या विरोधामुळे एसबीआय संभ्रमित आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार बँकेची कार्यकारी समिती याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. मात्र, यावर्षी SBI ने अदानी गृपला कर्ज देण्याबाबत अद्याप चर्चा केलेली नाही. अशा परिस्थितीत अदानी ग्रुपचा हा प्रोजेक्ट अर्ध्यावर राहणार असा अंदाज वर्तविला जात आहे.

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, "अदानी एन्टरप्रायजेस लिमिटेडला 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी देण्याच्या प्रस्तावावर बँकने अद्याप विचार केला नाही. बँकेच्या कार्यकारी समितीने अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही."

अदानी गृपचा कार्मिकल खाण प्रोजोक्ट 2010 मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. तेव्हापासून हा प्रोजेक्ट लोकांच्या विरोधाचे केंद्र बनला आहे. एसबीआयचे भागधारकही विरोधी पक्षात सामील झाले आहेत. ब्लॅकरोक आणि नॉर्वेच्या स्टोअरब्रँड एएसएने गेल्या वर्षी या प्रकरणावर आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर, एसएमआयच्या ग्रीन बॉन्डमधील अमेंडी एसएने आपला हिस्सा काढून घेतला होता, कारण एसएमआयच्या अदानी गृपच्या कार्मिकल खाणीत भाग घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, "एसबीआय अध्यक्ष दिनेशकुमार खारा यांनी ऑक्टोबरमध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांनी ऑस्ट्रेलियन प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अदानी यांना पैसे देण्यास नकार दिला. परंतु, कर्ज देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही."

यासंदर्भात अदानी यांनी एका निवेदनात म्हटले होते की कार्मिकल खाणीचे बांधकाम चांगले सुरू आहे आणि आम्ही 2021 मध्ये कोळसा निर्यात करण्याच्या मार्गावर आहोत. खाण आणि रेल्वे प्रकल्पांना संपूर्ण अर्थसहाय्य दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com