एसबीआय फाउंडेशनचा मदतीचा हात

Dainik Gomantak
मंगळवार, 5 मे 2020

एसबीआय फाउंडेशनच्या मदतीअंतर्गत देशातील महत्त्वपूर्ण हॉस्पिटल्समध्ये व्हेंटिअलेटर्स, पीपीई किटचे वितरण करण्यात आले. तसेच भारतातील ४ मुख्य केंद्रात प्रत्येक दिवशी दहा हजार नागरिकांच्या फूड किटची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे

सगळा देश कोविड 19 च्या संकटाचा सामना करत आहे. अशा स्थितीत भारतीय स्टेट बँकेने सीएसआर अंतर्गत एसबीआय फाउंडेशननद्वारे ३० कोटी रूपयांच्या मदतीची तयारी केली आहे. खाण्याची व्यवस्था, स्वास्थ्य सेवांचे मजबुतीकरण, स्वास्थ्य कर्मचा-यांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करणे अशा योजनांचा समावेश आहे.
एसबीआय फाउंडेशनच्या मदतीअंतर्गत देशातील महत्त्वपूर्ण हॉस्पिटल्समध्ये व्हेंटिअलेटर्स, पीपीई किटचे वितरण करण्यात आले. तसेच भारतातील ४ मुख्य केंद्रात प्रत्येक दिवशी दहा हजार नागरिकांच्या फूड किटची व्यवस्था करण्यात आली आहे. इसीएचओ इंडिया व स्वास्थ्य व कल्याण मंत्रालया बरोबर एसबीआय फाउंडेशनने इको इंडिया प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये भारतभर विविध राज्यात पन्नास हजार कर्मचा-याना ट्रेनिंग देण्यात येईल. तसेक एसबीआय महिला समितीच्या अध्यक्षा रीता अग्रवाल यानी कर्मचा-यांच्या पत्नीना मदत निधीमध्ये योगादान देण्याचे आवाहन केले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या निधीचा उपयोग भारतातील महत्त्वाच्या हॉस्पिटल्समध्ये व्हेंटिलेटर्स देणे तसेच जेवणाची पाकिटे देण्यासाठी करण्यात येईल. युएसएआईडी बरोबर कोविड 19 हेल्थकेअर अप्लायंस देखील लॉच करण्यात आले आहे.
एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार म्हणाले , 'एसबीआय कायम देश व समाजाचा विचार करते. सध्या देश कोविड 19 च्या संकटाचा सामना करत आहे. आमचा प्रयत्न या सामूहिक लढ्यात भारताने यशस्वी व्हावे असाच आहे. अनेकजणानी आमच्या आवाहनानंतर मदतनिधीमध्ये आपले योगदान दिले आहे त्यांचे आम्ही आभारी आहोत.

संबंधित बातम्या