SBI Guideline: 2,000 रुपयांच्या नोटांबाबत SBI चा मोठा निर्णय, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

30 सप्टेंबरपर्यंत लोक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात असे आरबीआयने म्हटले आहे.
SBI Guideline About 2,000 Rs Note
SBI Guideline About 2,000 Rs NoteDainik Gomantak

SBI Guideline: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2000 च्या नव्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. पण, 30 सप्टेंबरपर्यंत लोक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात असे आरबीआयने म्हटले आहे. ही नोटाबंदी नसून 2000 च्या नव्या नोटा चलनातून बाहेर काढण्याचा एक मार्ग आहे. त्याचवेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नोटा बदलण्यासंदर्भात ग्राहकांना खुशखबर दिली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा बदलण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की नोट बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही आणि तुम्हाला कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. एकावेळी 10 नोटा बदलल्या जातील, म्हणजे 20,000 पर्यंतच्या नोटा एकावेळी बदलता येतील.

2000 च्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा ओळखपत्र आवश्यक आहे, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत होते. याबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारचे मेसेज व्हायरल करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

SBI Guideline About 2,000 Rs Note
2000 Rupees Note: 'PM मोदींना 2000 ची नोट बाजारात आणायची नव्हती...', माजी प्रधान सचिवांनी सांगितली मजबूरी!

तुमच्या जवळच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही 2000 च्या नोटा बदलू शकता. यासाठी तुमचे त्या बँकेत खाते असणे आवश्यक नाही. तुम्ही थेट बँकेच्या काउंटरवर जाऊन नोट बदलू शकता आणि जर तुमचे त्या बँकेत खाते असेल तर तुम्ही तुमच्या खात्यात पैसेही जमा करू शकता. नोटा बदलण्याची प्रक्रिया 23 मे पासून सुरू होणार असून ती 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ही नोटाबंदी नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

2016 मध्ये जेव्हा नोटाबंदीची घोषणा करण्यात आली, तेव्हा 2000 च्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या. सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्या जागी ₹ 500 आणि ₹ 2000 च्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या. मात्र आता 2000 च्या नव्या नोटा बंद करण्यात येत आहेत. म्हणजेच ₹ 500 हे देशातील सर्वात मोठे चलन असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com