SBI KAVACH LOAN: कोरोनाच्या उपचारासाठी बँक कर्ज देणार; लाभ घेण्यासाठी जाणुन घ्या

Indian Rupee.jpg
Indian Rupee.jpg

कोरोना संकटाशी (Covid19) लढणाऱ्या ग्राहकांसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने (SBI) एक नवी योजना आणली आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना SBI KAVACH अंतर्गत पर्सनल लोन देणार आहे. या लोनच्या माध्यमातुन कोरोना एसबीआयच्या ग्राहकांना (SBI Customers) तसेच त्यांच्या कुटूंबीयांना कोरोना विषाणुची बाधा झाल्यास मदत होणार आहे. 1 एप्रिल 2021 किंवा त्यानंतर कोरोना विषाणुची बाधा झालेल्या रुग्णांना या याजनेचा फायदा घेता य़ेणार आहे. (SBI KAVACH LOAN: bank will provide loans for the treatment of Covid-19)

याजनेबद्दलच्या विशेष गोष्टी: 

  1. या योजनेंतर्गत पगार असलेला किंवा पगार नसलेला तसेच पेंशनधारक असलेला एसबीआयचा ग्राहक कर्ज घेऊ शकतो.
  2. ग्राहकांना कर्ज घेण्यासाठी कोणत्याही कोलॅटरलची देखील आवश्यकता भासणार नाही.
  3. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या योजनेंतर्गत कर्जदार कोविड-19 च्या उपचारासाठी आधीच केलेल्या खर्चाला देखील रिइंबर्स करु शकणार आहे.
  4. कर्ज घेताना ग्राहकांना प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी डिपॉझिट, प्री-पेमेंट दंड किंवा कोणत्याही मुदतपूर्व शुल्काची चिंता करण्याची गरज नाही.

कर्जाचे तपशील

हे पर्सनल लोन वार्षिक 8.5 टक्क्यांच्या व्याज दरावर पाच लाखांपर्यंतच्या रकमेवर उपलब्ध असेल. कर्जाचा कालावधी पाच वर्षांचा आहे. त्यात तीन महिन्यांपासून कर्जाचे Moratorium आहे. जर आपण 60 महिन्यांपर्यंतच्या मुदतीच्या कर्जासह कर्ज घेत असाल तर आपल्याला 57 हप्त्यांमध्ये कर्ज परत करावे लागेल, ज्यामध्ये कर्जाच्या स्थगिती दरम्यान व्याज देखील द्यावे लागेल. ग्राहक किमान 25,000 ते कमाल 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

अशा पद्धतीने करा नोंदणी

ग्राहक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाऊ शकतात. सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण करून,  केवायसी KYC पूर्ण करुन तुम्हाला कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. याशिवाय कर्जही डिजिटल पद्धतीने घेतले जाऊ शकते. Pre-Apporved लोन बँकेच्या स्मार्टफोन योनो ॲपवर उपलब्ध आहे. येथे काही मिनिट आणि काही चरणांमध्ये ग्राहकांना त्यांचे कवच वैयक्तिक कर्ज मंजूर होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com