SBI ची फंड्स ट्रांसफर सर्विस 14 तास बंद...

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 मे 2021

आता 31 मे 2021 पर्यंत एसबीआयच्या शाखा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच उघडतील. जर तुम्हाला बँकेच्या कोणत्याही कामात सामोरे जायचे असेल तर तुम्हाला या मर्यादेच्या आत बँकेत जावे लागेल.

SBI BANK: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे(corona second wave) देशातील(India) सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या शाखेच्या वेळापत्रकात(Time Table) बदल केला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे एसबीआय शाखेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता 31 मे 2021 पर्यंत एसबीआयच्या शाखा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच उघडतील. जर तुम्हाला बँकेच्या कोणत्याही कामात सामोरे जायचे असेल तर तुम्हाला या मर्यादेच्या आत बँकेत जावे लागेल.(SBI National Electronic Fund Transfer System closed for 14 hours ...)

कोरोना साथीच्या आजारामुळे एसबीआयने आपल्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. बँकेने अधिसूचनेत म्हटले आहे की बँकेची प्रशासकीय कार्यालये पूर्वीच्या बँकिंग तासात 50 टक्के कर्मचार्‍यांसह काम करतील. कोरोना संकटामध्ये बँक कर्मचारी सतत रीस्क घेत लोकांची सेवा करण्यात गुंतलेले असतात. अशा परिस्थितीत आपल्या कर्मचार्‍यांचे प्राण वाचवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांव्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील बँकांनीही हा निर्णय घेतला आहे.

चिनी अब्जाधीशांना मागे टाकत अंबानी-अदानी यांचा आशिया खंडावर ताबा

31 मेपर्यंत केवळ या चार सुविधा बँकेत उपलब्ध असतील
बँकेने केवळ वेळच बदलली नाही तर त्यातील सेवांमध्येही कपात केली आहे. आता 31 मेपर्यंत काही निवडक सेवाच बँकेत उपलब्ध असतील. 31 मेपर्यंत बँकेतर्फे असे ट्वीट केले गेले आहे की, केवळ रोख जमा, चेकशी संबंधित कामे, डिमांड ड्राफ्ट(DD) / आरटीजीएस(RTGS), एनईएफटी(NEFT), सरकारी चालान संबंधित काम बँकेत(Bank) केले जाईल.

आपल्याला याचेही पालन करावे लागेल
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जाण्यासाठी तुम्हालाही काही नियम पाळावे लागतील. बँकेने एक अधिसूचना पत्रक जारी केले आहे त्यानुसार,  बँक शाखेत जाणाऱ्या लोकांना मास्क(Mask) घालणे अनिवार्य असणार आहे.मास्कशिवाय कोणालाही बॅंकेच्या आत प्रवेश दिला जाणार नाही.

Triumph ने लॉन्च केली नवी बाईक; मात्र जगातले मोजकेच लोक विकत घेऊ शकतील

बँकेची ही सेवा 14 तास बंद राहील
आरबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की 23 मे रोजी एनईएफटी(NEFT) सेवा 14 तास काम करणार नाही. परंतु आरटीजीएस(RTGS) सेवा उत्तम प्रकारे कार्य करत राहील. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर सिस्टम(National Electronic Funds Transfer System) ही संपूर्ण देशभरात कार्यरत पेमेंट सिस्टम आहे. ज्यामध्ये एका बँक खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. एनईएफटी हा ऑनलाइन बँकिंगचा(Online Banking) एक भाग आहे ज्यामध्ये काही मिनिटांत पैसे हस्तांतरित केले जावू शकतात.

संबंधित बातम्या