SBI: आज सेवा 2 तास बंद राहणार

SBI च्या ग्राहकांनी ऑनलाईन व इतर प्लॅटफॉर्मवर या व्यवहारां व्यतिरिक्त इतर कामे करु नयेत, असा सल्ला बँकेकडून देण्यात आला आहे. SBI बँकेने आपल्या ट्विटरमधून हा अलर्ट आपल्या ग्राहकांसाठी दिला आहे.
SBI: आज सेवा 2 तास बंद राहणार
SBI Bank Dainik Gomantak

मुंबई: SBI च्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी SBI बँक काही सेवा बुधवारी, 15 सप्टेंबर रोजी 2 तास बंद करण्यात येणार आहेत. या काळात ग्राहकांनी अन्य कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येणार नाहीत. SBI बँकेने आपल्या ट्विटरमधून हा अलर्ट आपल्या ग्राहकांसाठी दिला आहे.

यामध्ये, SBI ने आपल्या ट्विटर (Twitter)मध्ये सांगितले आहे की, काही सेवांच्या देखभालीमुळे 15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा बंद राहणार आहेत. यामध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, (Yono)योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असणार आहेत. SBI ने एका ट्विट मध्ये सांगितले आहे की, 15 सप्टेंबरला 120 मिनिटे या सेवा बंद असणार.

यापूर्वी, याच महिन्यात 4 सप्टेंबर रोजी काही देखभालीच्या कामामुळे SBI ची योनो सेवा जवळपास 3 तास बंद होती. शिवाय जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखील बँकिंग सेवा बंद केली होती. सहसा बँकेकडून देखभालीची कामे ही रात्रीच केली जातात. यामुळे ग्राहकांना असा कोणताही फटका बसत नाही.

ऑनलाईन बँकिंगचे सुमारे आठ कोटी ग्राहक :

देशातील सुमारे आठ कोटी ग्राहक SBI ची इंटरनेट बँकिंग सेवेचा वापर करतात. तसेच सुमारे 2 कोटी लोक मोबाईल बँकिंगचा (Mobile banking)वापरतात. आणि योनोवर वापरणारे ग्राहकांची संख्या 3.45 कोटी असून, या सर्व प्लॅटफॉर्मवर दररोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉगिन करून आपले व्यवहार करतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com