SEBI चा आदित्य बिर्ला ग्रुपला दणका, ठोठावला 1 कोटींचा दंड

SEBI, BSE, NSE आणि डिपॉझिटरीज यांनी केलेल्या संयुक्त तपासणीच्या आधारे मार्च 2019 मध्ये आदित्य बिर्ला मनीच्या विरोधात यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली होती.
SEBI fined 1 crore to Aditya Birla Money for rule violation
SEBI fined 1 crore to Aditya Birla Money for rule violation Dainik Gomantak

मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने आदित्य बिर्ला मनी (Aditya Birla Money )लिमिटेडला स्टॉक दलाल नियमनसह बाजार नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबी, BSE, NSE आणि डिपॉझिटरीज यांनी केलेल्या संयुक्त तपासणीच्या आधारे मार्च 2019 मध्ये आदित्य बिर्ला मनीच्या विरोधात यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मार्च 2018 मध्ये बाजार नियामकाने कंपनीवर विशेष हेतू तपासणी देखील केली होती. या तपासणीच्या निष्कर्षांच्या आधारे सेबीने ही कारवाई सुरू केली असल्याचे समजते. (SEBI fined 1 crore to Aditya Birla Money for rule violation)

या प्रकरणात सेबीने म्हटले आहे की, कोणत्याही नोंदणीकृत स्टॉक ब्रोकरने ठरवून दिलेले नियम पाळले पाहिजेत. तसेच, सामान्य परिस्थितीत, ग्राहकांना गुंतवणूकीचा कोणताही सल्ला देऊ नये जे नियम कंपनीनेच पालन केले नाही.

SEBI fined 1 crore to Aditya Birla Money for rule violation
Facebook WhatsApp Instagram ठप्प, कंपनीला 5 हजार कोटींचा फटका

काय आहे प्रकरण ?

सेबीने सांगितले की, आदित्य बिर्ला मनी लिमिटेडने स्टॉक ब्रोकर नियमांचे उल्लंघन करून कोणत्याही कराराशिवाय ग्राहकांसाठी पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा केली आहे. त्यात म्हटले आहे की, आदित्य बिर्ला मनीकडे त्याच्या व्यवसायाचे संचालन आणि ग्राहकांशी व्यवहार करताना योग्य कौशल्य आणि काळजी सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी व्यवस्था आणि अंतर्गत नियंत्रणे नव्हती.

बाजार नियामकाने लादलेल्या एकूण 1.02 कोटी रुपयांचा दंड भरण्यासाठी कंपनीला 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

सेबीने प्रस्तावित केले आहे की बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे शेअर्सचे वाटप करताना, सार्वजनिक इश्यूच्या किमान 5 टक्के मूल्य ठेवणे आवश्यक आहे. बाजार नियामकाने गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचे (एनआयआय) उप-वर्गीकरण करण्याचा सल्ला देखील दिला आहे. सेबीने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यावर लोकांकडून 20 ऑक्टोबरपर्यंत उत्तरे मागवण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com