Doorstep Banking Services: या लोकांना मिळणार घरपोच बँकिंग सुविधा!

Senior Citizen Banking: देशभरातील अनेक बँका घरोघरी बँकिंग सुविधा पुरवत आहेत.
Banking Services
Banking ServicesDainik Gomantak

Doorstep Banking For Senior Citizens: देशभरातील अनेक बँका घरोघरी बँकिंग सुविधा पुरवत आहेत, परंतु याअंतर्गत काही खास ग्राहकांनाच त्याचा लाभ मिळतो. सर्वसामान्य ग्राहकांना नेहमी बँकेच्या लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. अशा परिस्थितीत, वित्त मंत्रालयाचा वित्तीय सेवा विभाग (DFS) लवकरच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरी बसून बँकिंग सुविधेचा लाभ देणार आहे.

याशिवाय, घरोघरी बँकिंग सुविधेसाठी एक युनिव्हर्सल फोन नंबरही सुरु केला जाईल. RBI ने आधीच बँकांना (Bank) घरोघरी बँकिंग सेवेसाठी आदेश जारी केले आहेत. याशिवाय विमा आणि चलन सेवाही पुरवणार असल्याचे सांगितले जात आहे.

Banking Services
DA Hike: तोहफा, तोहफा, तोहफा! केजरीवाल सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

अर्थ मंत्रालय अधिसूचना जारी करेल

देशभरात 70 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 5 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. सरकार (Government) त्यांना मोठी भेट देणार आहे. लवकरच त्यांच्यासाठी बेसिक बँकिंग सेवा घरपोच उपलब्ध होणार आहे. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभाग (DFS) बँकांसाठी नवीन नियम जारी करु शकते, ज्यामध्ये काही शाखा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दारात बँकिंग सेवा प्रदान करतील.

दिव्यांगांनाही लाभ मिळणार

डोअरस्टेप बँकिंग सेवा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठीच नाही तर दिव्यांगांसाठीही उपलब्ध असेल. या सेवेसाठी ग्राहकांकडून खूपच कमी शुल्क आकारले जाईल. तसेच घरोघरी बँकिंग सुविधेसाठी एक युनिव्हर्सल फोन नंबर सुरु केला जाईल. RBI ने दोनदा डोअरस्टेप बँकिंगसाठी अध्यादेश जारी केला आहे. ज्यामध्ये बँकांना पहिली डेडलाइन 31 डिसेंबर 2017 आणि दुसरी डेडलाइन 30 एप्रिल 2020 देण्यात आली होती. मात्र देशभरात घरोघरी बँकिंग सेवा अद्याप सुरु झालेली नाही. मात्र आता सरकारने अधिसूचना जारी करुन ही सेवा लवकरच सुरु करायची आहे.

Banking Services
Salary Hike: या राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट, खात्यात येणार इतके हजार

कोणती सुविधा मिळेल?

डोअरस्टेप बँकिंग सेवेअंतर्गत खाते उघडणे, मुदत ठेव, पेन्शन सेवा, विमा, गुंतवणूक (Investment) आणि कर्ज यासारख्या सुविधा उपलब्ध असतील. सध्या ही सेवा काही शाखांमध्येच सुरु केली जाईल, त्यानंतर विस्तार योजनेअंतर्गत ती इतर शाखांशीही जोडली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com