पाचव्या दिवशी देखील सेन्सेक्समध्ये घसरण; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

इंडियन शेअर्स मार्केटः सर्वसाधारण अर्थसंकल्पाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे शेअर बाजार आपल्या ऐतिहासिक उंचीवरून खाली घसरत आहे. 

नवी दिल्ली: इंडियन शेअर्स मार्केटः सर्वसाधारण अर्थसंकल्पाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे शेअर बाजार आपल्या ऐतिहासिक उंचीवरून खाली घसरत आहे. आज सलग पाचव्या दिवशीही  बाजारात जोरदार घसरण दिसून आली आहे. बीएसईवर अवघ्या 5  दिवसांत गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहे. देशाचा अथसंकल्प  बजेट काही दिवसातच 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे.

सेन्सेक्स आपल्या ऐतिहासिक उंचिवरून 3300  अंकाने घसरला आहे. देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर मार्केट बीएसई सेन्सेक्सने आज 47,000 ची सर्वकालीन उच्च स्तर सोडलो आहे. २१ जानेवारीला सेन्सेक्सने 50184 ची पातळी गाठली होती, सेन्सेक्स त्या उंचीवरून 3300 अंक खाली घसरला आहे.  निफ्टीचा विचार केला तर निफ्टीही सर्वोच्च पातळीच्या 14753 पातळीवरून 936 अंकांनी खाली घसरला आहे. आठवड्याच्या चौथ्या सत्रात आज निफ्टीत बाजार बंद होताना रिकव्हरी दिसून आली. अखेर निफ्टीने 150 अंक घसरून 13818 वर बंद झाला. शेवटच्या तासात सेन्सेक्समध्येही तेजी दिसून आली. आणि सेन्सेक्स  536 अंकांनी घसरून 46,874 वर बंद झाला. 

रिअलइस्टेट, आयटी आणि एफएमसीजी समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. तेल आणि गॅस समभागांमध्ये काही प्रमाणात खरेदी दिसून आली आहे. रिलायन्स वगळता तेल आणि गॅस समभागात खरेदी झाल्याचे पहायला मिळाले आहे. एचआयएल, मारुती, विप्रो, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, डिव्हिस लॅब, यूपीएल, इन्फोसिस, इंडसइंड बँक, आयटीसी या समभागांनी निफ्टिमध्ये घसरण नोंदवली. तर अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, आयओसी, बीपीसीएल, गेल ,आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, श्रीराम सिमेंट, हीरो मोटो कॉर्पोरेशन, टायटन, एनटीपीसी हे समभाग वधारले.

 

संबंधित बातम्या