Share Market Update: भांडवली बाजारात चढ-उतार कायम; सेन्सेक्स व निफ्टी घसरले  

Share Market Update: भांडवली बाजारात चढ-उतार कायम; सेन्सेक्स व निफ्टी घसरले  
Share Market

देशातील भांडवली बाजारात मागील काही दिवसांपासून सुरु असलेले मोठे चढ-उतार कायम असल्याचे आजच्या सत्रव्यवहारातून पुन्हा एकदा पाहायला मिळाले. आठवड्याच्या पहिल्या सत्रव्यवहारात मोठी उसळी नोंदवल्यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही निर्देशकांनी घसरण नोंदवली आहे. आणि त्यासोबतच देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर मार्केटचा निर्देशांक 50 हजाराची पातळी सोडून खाली आला आहे. तर देशातील सर्वात मोठ्या शेअर बाजारात देखील आज घसरण झाली आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स कालच्या तुलनेत 1.25 टक्क्यांनी खाली उतरला. आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 1.04 टक्क्यांनी घसरला. (The Sensex and Nifty are down today)

देशातील भांडवली बाजारातील मुंबई शेअर मार्केटचा निर्देशांक बीएसई (Sensex) आज सकाळी कालच्या तुलनेत 87.46 अशांनी खाली येत 50,049.12 वर खुला झाल्याचे पाहायला मिळाले. तर देशातील सर्वात मोठ्या भांडवली बाजाराचा निर्देशांक एनएसई (Nifty) कालच्या तुलनेत आज सकाळी 33.25 अंकांनी घसरत 14,811.85 च्या पातळीवर उघडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दिवसभराच्या व्यवहारात दोन्ही निर्देशकांनी घसरणच नोंदवली. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 627.43 अंकांनी खाली येत 49,509.15 वर बंद झाला. आणि राष्ट्रीय शेअर बाजारचा निर्देशांक 154.40 अशांनी घसरत 14,690.70 च्या स्तरावर स्थिरावला. 

चालू आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी होळीच्या निमित्ताने समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. तर काल मंगळवारी सेन्सेक्स तब्बल 1,128.08 अशांनी वधारत 50,136.58 च्या पातळीवर बंद झाला होता. आणि निफ्टी 337.80 अंकांनी वधारून 14,845.10 च्या स्तरावर बंद झाला होता. यापूर्वी मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात देखील भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी उसळी नोंदवली होती. कालच्या सत्र व्यवहारातील उसळीमुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता तब्बल 6 लाख कोटींनी वाढली होती. व मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे मूल्य 204.47 लाख कोटींपर्यंत पोहचले होते. 

दरम्यान, आज मुंबई शेअर (Mumbai Share Market) बाजारातील एचसीएल टेक, रिलायन्स, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, इन्फोसिस,टेक महिंद्रा, ओएनजीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, डॉक्टर रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, भारती एअरटेल या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे पाहायला मिळाले. तर बँक ऑफ बरोडा, एसबीआय, टीसीएस, टायटन, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, महाराष्ट्र बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, सेंट्रल बँक या कंपन्यांचे समभाग वधारले.    

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com