Share Market : आठवड्याच्या शेवटच्या व सलग दुसऱ्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरला  

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 5 मार्च 2021

देशातील भांडवली बाजाराने आठवड्याच्या पाचव्या सत्रात आणि सलग दुसऱ्या सत्रव्यवहारात घसरण नोंदवली आहे.

देशातील भांडवली बाजाराने आठवड्याच्या पाचव्या सत्रात आणि सलग दुसऱ्या सत्रव्यवहारात घसरण नोंदवली आहे. आठवड्याच्या पहिल्या तीन सत्र व्यवहारात तेजी नोंदवल्यानंतर भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी काल आणि आज घसरण नोंदवल्याचे पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा आज कालच्या तुलनेत 0.87 टक्क्यांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 0.95 टक्क्यांनी खाली आला. पाचव्या सत्रादिवशी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा बीएसई निर्देशांक कालच्या तुलनेत 328.72 अशांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई 102.8 अंकांनी घसरत खुला झाल्याचे पाहायला मिळले. 

देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर मार्केटचा निर्देशांक सेन्सेक्स आज 440.76 अशांनी घसरून 50,405.32 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजराच्या निफ्टीने 142.65 अशांची घसरण नोंदवत 14,938.10 च्या पातळीवर बंद झाला. कालच्या सत्र व्यवहारात बीएसई 598.57 अंकांनी घसरून 50,846.08 वर बंद झाला होता. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 164.85 अशांनी खाली येत 15,080.75 च्या स्तरावर बंद झाला होता. त्यानंतर आज देखील दोन्ही निर्देशकांनी घसरण नोंदवल्यामुळे दोन्ही सत्रात मिळून, सेन्सेक्स 2.03 व निफ्टी देखील 2.03 टक्क्यांनी खाली आला आहे. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आजच्या सत्र व्यवहारात 50,886.19 या उच्चांकी पातळीवर पोहचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने आजच्या सत्रात 15,092.35 ची उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र त्यानंतर दोन्ही निर्देशांक घसरल्याचे पाहायला मिळाले. यानंतर जगातील उर्वरित भांडवली बाजारांमध्ये दिसलेल्या घसरणीचा प्रभाव आणि किरकोळ नफेखोरीमुळे भांडवली बाजारात पडझड झाल्याचे जाणकारांचे म्हटले आहे.  

आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील ओएनजीसी, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स, लार्सन अँड टुब्रो, टायटन यांच्या समभागांमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर एसबीआय, बँक ऑफ बरोडा, एशियन पेंट, डॉक्टर रेड्डीज, पॉवरग्रिड, सेंट्रल बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, टीसीएस, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, महाराष्ट्र बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, एनटीपीसी या कंपन्यांचे शेअर्स खाली आले. 

 

संबंधित बातम्या