आठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रमी वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

निफ्टी आणि सेन्सेक्सने चांगलाच उच्चांक गाठला असून तब्बल 200 सत्रांनंतर निफ्टीने हा रेकॉर्ड केला आहे.  आतापर्यंत पहिल्या सत्रात सेन्सेक्स 42,473 पर्यंत गेला आहे तर निफ्टी 12430.50 पर्यंत जाऊन रेकॉर्ड केला आहे.

नवी दिल्ली- जगातील प्रमुख आर्थिक देशाच्या सत्तांतराचा मोठा परिणाम भारतातील शेअर मार्केटवर दिसून आला आहे. नवीन आठवडा चालू शेअर होतानाच शेअर बाजारात विक्रमी तेजी दिसून आली आहे. निफ्टी आणि सेन्सेक्सने चांगलाच उच्चांक गाठला असून तब्बल 200 सत्रांनंतर निफ्टीने हा रेकॉर्ड केला आहे.  आतापर्यंत पहिल्या सत्रात सेन्सेक्स 42,473 पर्यंत गेला आहे तर निफ्टी 12430.50 पर्यंत जाऊन रेकॉर्ड केला आहे.

शेअर मार्केट फॉर्मात-  

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय शेअर बा जाराने मोठी उसळी घेतली आहे. आज सेन्सेक्समध्ये 584.09 म्हणजे 1.39 टक्क्यांनी तर निफ्टीत 147.10 म्हणजे 1.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याआधी शुक्रवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती.  सेन्सेक्समध्ये 552.90 अंशांनी म्हणजे 1.34  टक्क्यांनी वाढ होऊन तो 41,893.06 पर्यंत गेला होता. तर निफ्टीत 143.20 अंशांनी म्हणजे 1.18 टक्के वाढून 12,263.50 वर बंद झाला होता.

जगातील सत्तापालट शेअर बाजाराच्या पथ्यावर- 

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर जगातील शेअर मार्केटमध्ये आणि बाजारपेठांमध्ये मोठी घडामोड दिसून येत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असून तेथे तिसरी लाट आल्याचे  मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या