Share Market Update : तिसऱ्या सत्र व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टीची घसरगुंडी

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात मोठी आपटी नोंदवली आहे. तर मागील सलग चार सत्र व्यवहारांमध्ये शेअर बाजारात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात मोठी आपटी नोंदवली आहे. तर मागील सलग चार सत्र व्यवहारांमध्ये शेअर बाजारात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज एकाच सत्रात देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1.12 टक्क्यांनी खाली उतरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात 1.27 टक्क्यांनी घसरण झाली. तसेच मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रासह चालू आठवड्यातील पहिल्या तीन सत्रांमध्ये मिळून सेन्सेक्स तब्बल 3.69 टक्क्यांनी आणि निफ्टी देखील 3.69 खाली आला आहे. आज झालेल्या घसरणीमुळे सेन्सेक्सने 50 हजाराची पातळी सोडली. तर निफ्टीने कालच्या व्यवहारातच 15 हजाराची पातळी सोडली होती. (The Sensex and Nifty fell sharply today)

(Share Market) आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कालच्या तुलनेत 72.06 अंकांनी वधारत 50,436.02 वर खुला झाला. याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजाराचा  निर्देशांक सेन्सेक्स 36.1 अंकांनी वधारत 14,946.55 च्या पातळीवर उघडला होता. मात्र त्यानंतर दिवसभराच्या व्यवहारात दोन्ही निर्देशकांमध्ये जोरदार घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज आठवड्याच्या तिसऱ्या सत्र व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई 562.34 अंकांनी घसरत 49,801.62 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 189.15 अशांनी खाली येत 14,721.30 च्या पातळीवर बंद झाला. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेली वाढ ही खेदजनक - अर्थमंत्री निर्मला सीतारमण 

दरम्यान, (The Sensex and Nifty fell sharply today) काल मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 31.12 अंकांनी खाली येत 50,363.96 वर बंद झाला होता. याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 19.05 अशांनी घसरत 14,910.45 वर स्थिरावला होता. मात्र आजच्या सत्रात दोन्ही निर्देशकांनी पुन्हा मोठी घसरण नोंदवली आहे. आजच्या सत्र व्यवहारात सेन्सेक्स 50,561.12 वर आणि निफ्टी 14,956.55 च्या उच्चांकी पातळीवर पोहचला होता. मात्र त्यानंतर काही प्रमाणात गुतवणूकदारांनी केलेली नफेखोरी आणि काही देशांनी ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीला दिलेल्या स्थगितीचा जागतिक भांडवली बाजारावरील चिंतेचा झालेला परिणाम देशातील भांडवली बाजारावर झाल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. 

आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील ओएनजीसी, डॉक्टर रेड्डीज, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एशियन पेंट, मारुती सुझुकी, पॉवरग्रिड,  एचसीएल टेक, टायटन, टेक महिंद्रा, एनटीपीसी, बँक ऑफ बरोडा, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, लार्सन अँड टुब्रो, महाराष्ट्र बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, एसबीआय, सेंट्रल बँक, इंडसइंड बँक, एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग घसरले. तर इन्फोसिस, आयटीसी, आणि टीसीएस या कंपन्यांचे समभाग वधारल्याचे पाहायला मिळाले.   

 

संबंधित बातम्या