Share Market Update : सलग दोन व्यवहारांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स व निफ्टी वधारला 

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 26 मार्च 2021

सलग दोन सत्रव्यवहारांच्या घसरणीनंतर देशातील भांडवली बाजाराने आज तेजी नोंदवली आहे.

सलग दोन सत्रव्यवहारांच्या घसरणीनंतर देशातील भांडवली बाजाराने आज तेजी नोंदवली आहे. आठवड्याच्या शेवटच्या सत्रव्यवहारात देशातील सर्वात जुना शेअर मार्केट मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स आज 568.38 अशांनी तेजी नोंदवत 49,008.50 च्या पातळीवर बंद झाला. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने देखील 182.40 अंकांची वाढ नोंदवली असून निफ्टी 14,507.30 वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कालच्या टुतुलनेत 529.13 अंकांनी वाढून 48,969.25 वर खुला झाला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक कालच्या तुलनेत 181.40 अशांनी वधारत 14,506.30 वर उघडला. (The Sensex and Nifty gained today after falling for two consecutive sessions)

देशाच्या भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशांक कालच्या व्यवहारात चांगलेच घसरले होते. काल मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 740.19 अशांनी खाली येत 48,440.12 बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 224.50 अंकांनी घसरत 14,324.90 च्या पातळीवर स्थिरावला होता. त्यानंतर आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1.17 टक्क्यांनी व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 1.27 टक्क्यांनी वधारला. याशिवाय, आजच्या व्यवहारात मुंबई शेअर मार्केटचा बीएसई 49,234.66 च्या उच्चांकी पातळीवर पोहचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई 14,572.90 च्या उच्चांकी स्तरावर पोहचला होता. 

दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारातील (Sensex) भारती एअरटेल, एचसीएल टेक, बँक ऑफ बरोडा, रिलायन्स, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, एनटीपीसी, इन्फोसिस, टीसीएस, टायटन, टेक महिंद्रा, महाराष्ट्र बँक, ओएनजीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, डॉक्टर रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांचे समभाग वधारले. तर इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, सेंट्रल बँक, पॉवरग्रिड, आयटीसी या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे पाहायला मिळाले. 

संबंधित बातम्या