Share Market Update : पाच सत्रानंतर भांडवली बाजाराने नोंदवली तेजी; सेन्सेक्स व निफ्टी वधारला 

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 19 मार्च 2021

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या सत्रात मोठी तेजी नोंदवली आहे.

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या सत्रात मोठी तेजी नोंदवली आहे. आणि त्यासोबतच भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी आज मागील पाच सत्रव्यवहारापासून चालू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. आजच्या सत्र व्यवहारात देशातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबई शेअर बाजार 48,881.19 वर आणि राष्ट्राचे शेअर बाजार 14,471.15 वर खुला झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दिवसभराच्या व्यवहारात दोन्ही निर्देशकांनी तेजी नोंदवली. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 641.72 अंकांनी वधारत 49,858.24 वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 186.15 अशांनी वाढत 14,477.00 च्या पातळीवर बंद झाला. (The Sensex and Nifty gained in todays trade)

भांडवली बाजाराने चालू आठवड्याच्या पहिल्या चारही सत्रात आणि मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात घसरण नोंदवली होती. या पाचही सत्रात मिळून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 4.86 टक्क्यांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 4.80 टक्क्यांनी खाली आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तब्बल आठ लाख कोटी रुपयांच्या कमाईवर पाणी सोडावे लागले होते. तसेच मुंबई शेअर बाजाराचे भांडवल मागील पाच सत्रात 8,04,216,71 ने कमी झाले होते. मात्र आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा बीएसई 1.30 टक्क्यांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई 1.28 टक्क्यांनी वधारल्याचे पाहायला मिळाले. 

सीबीआयने कॅडबरी इंडियाविरूद्ध गुन्हा दाखल केला

(The Sensex and Nifty gained in todays trade) काल गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स एकाच सत्रात तब्बल 585.10 अशांनी घसरत 49,216.52 च्या पातळीवर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 163.45 अशांनी घसरत 14,557.85 वर स्थिरावला होता. त्यानंतर आजच्या सत्र व्यवहारात सेन्सेक्सने 50,003.58 ची उच्चांकी पातळी गाठली होती व निफ्टी देखील 14,788.25 या उच्चांकीवर पोहचला होता. मात्र त्यानंतर गुंतवणूकदाराच्या नफेखोरीमुळे दोन्ही निर्देशांक काही प्रमाणात खाली आहे. 

मुंबई शेअर (Mumbai Share Market) बाजारातील ओएनजीसी, डॉक्टर रेड्डीज, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एशियन पेंट, पॉवरग्रिड, एचसीएल टेक, एनटीपीसी, बँक ऑफ बरोडा, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा,  एसबीआय, इंडसइंड बँक, एनटीपीसी, इन्फोसिस, आयटीसी आणि टीसीएस या कंपन्यांचे समभाग वधारले. तर मारुती सुझुकी, टायटन, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, महाराष्ट्र बँक, बजाज ऑटो, सेंट्रल बँक या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे पाहायला मिळाले. (The Sensex and Nifty gained in todays trade)       

संबंधित बातम्या