Share Market Update : कोरोनाच्या धास्तीमुळे भांडवली बाजार कोसळला; सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण 

Share Market
Share Market

देशातील भांडवली बाजाराने चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्याच सत्रात मोठी घसरण नोंदवली आहे. आठवड्याच्या पहिल्याच सत्रात देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर मार्केट मध्ये 1.74 टक्क्यांनी तर, सर्वात मोठ्या भांडवली बाजार राष्ट्रीय शेअर बाजाराने 1.54 टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी, मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात म्हणजे शुक्रवारी समभाग खरेदी-विक्री बंद होती. तर गुरुवारी देशातील दोन्ही निर्देशकांनी तेजी नोंदवली होती. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज आठवड्याच्या आणि महिन्याच्या पहिल्या सत्रात तब्बल 870.51 अंशांनी खाली येत 49,159.32 वर बंद झाला. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 229.55 अंकांनी घसरत 14,637.80 च्या पातळीवर स्थिर झाला. तर मागील सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 520.68 अंशांनी वधारत 50,029.83 वर पोहचला होता. त्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 176.65 अंकांनी वाढत 14,867.35 च्या स्तरावर बंद झाला होता.          

मागील काही दिवसांपासून देशातील भांडवली बाजरात सुरु असलेले चढ-उतार चालूच असल्याचे आजच्या व्यवहारातून देखील पाहायला मिळाले आहे. हे चढ-उतार कंपन्यांचे तिमाही निकाल आणि कोरोनाच्या वाढत्या परभावामुळे दिसत असल्याचे बाजरातील जाणकारांनी म्हटले आहे. आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई सकाळी 50,020.91 वर उघडला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 14,837.70 च्या पातळीवर खुला झाला होता. त्यानंतर दिवसभरात दोन्ही निर्देशांक खाली आल्याचेच पाहायला मिळाले. 

दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारातील  रिलायन्स,  ओएनजीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, डॉक्टर रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड,  बँक ऑफ बरोडा, एसबीआय, टायटन, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, महाराष्ट्र बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, सेंट्रल बँक, एचडीएफसी बँक या कंपन्यांचे समभाग घसरले. तर, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, टीसीएस या कंपन्यांचे समभाग वधारल्याचे पाहायला मिळाले.    

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com