Share Market Update : आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहारात सेन्सेक्स व निफ्टी वधारला

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 मार्च 2021

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या दुसऱ्या सत्रव्यवहारात तेजी नोंदवली आहे.

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या दुसऱ्या सत्रव्यवहारात तेजी नोंदवली आहे. कालच्या व्यवहाराच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 0.56 टक्क्यांनी वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 0.53 टक्क्यांनी वाढला आहे. तर तेच काल आठवड्याच्या पहिल्या व्यवहारात भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी किरकोळ घसरण नोंदवली होती. कालच्या तुलनेत आज सकाळी मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक 49,876.21 वर खुला झाला. याशिवाय, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 14,768.55 च्या पातळीवर उघडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर व्यवहार बंद होण्याच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराने 50 हजाराची पातळी गाठली. व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक देखील 15 हजारच्या जवळपास पोहचून विसावला. (The Sensex and Nifty rose in the second trade of the week)   

देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स आज चालू आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहारात 280.15 अशांनी वधारत 50,051.44 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 78.35 अंकांनी वाढून 14,814.75 च्या पातळीवर स्थिरावला. काल आठवड्याच्या पहिल्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई 86.95 अंकांनी घसरून 49,771.29 वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 7.60 अशांनी खाली येत 14,736.40 वर बंद झाला होता. 

नवीन आर्थिक वर्षात तुमच्या पगारावर होणार परिणाम 

दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारातील डॉक्टर रेड्डीज, भारती एअरटेल, एचसीएल टेक, बँक ऑफ बरोडा, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक, एनटीपीसी, इन्फोसिस, टीसीएस, मारुती सुझुकी, टायटन, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक या कंपन्यांचे समभाग वधारल्याचे पाहायला मिळाले. तर, ओएनजीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट, पॉवरग्रिड, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, बजाज ऑटो या कंपन्यांचे समभाग घसरले.    

संबंधित बातम्या