Share Market Update : भांडवली बाजारात सेन्सेक्स व निफ्टीने घेतली मोठी झेप 

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 30 मार्च 2021

देशातील भांडवली बाजाराने आज चालू आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात मोठी तेजी नोंदवली आहे.

देशातील भांडवली बाजाराने आज चालू आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात मोठी तेजी नोंदवली आहे. भाडवली बाजारातील मुंबई शेअर बाजाराने आज पुन्हा एकदा 50 हजाराची पातळी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराने देखील वाढ नोंदवत 15 च्या नजीकचा स्तर गाठला. चालू आठवड्यात बाजारातील समभाग खरेदी-विक्री तीनच दिवस होणार आहे. काल सोमवारी होळीच्या निमित्ताने बाजार बंद होता. तर शुक्रवारी गुड फ्रायडेच्या निमित्ताने बाजार बंद असेल. आजच्या सत्र व्यवहारात देशातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई 2.30 टक्क्यांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 2.33 टक्क्यांनी वधारला. (The Sensex and Nifty rose sharply in the capital market Today)

Suez Canal Blockage: सुएझ कॅनॉल जॅमचा भारतालाही फटका? वाचा कोणकोणत्या गोष्टींवर...

आजच्या सत्र व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,128.08 अशांनी वधारून 50,136.58 च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 337.80 अंकांनी वधारून 14,845.10 च्या स्तरावर बंद झाला. यापूर्वी मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात देखील भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी उसळी नोंदवली होती. त्यावेळी मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 568.38 अशांनी तेजी नोंदवत 49,008.50 च्या पातळीवर बंद झाला होता. आणि यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने (Nifty) देखील 182.40 अंकांची वाढ नोंदवत निफ्टी 14,507.30 वर पोहचला होता. 

त्यामुळे, मागील आठवड्याच्या सत्र व्यवहारातील शेवटच्या दिवशी आणि आजच्या व्यवहारातील तेजी मिळून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1696.46 अंकाने आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 520.20 अशांनी वधारला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि हे चढ उतार कोरोना लसीकरणाचा वेग आणि कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतरच स्थिर होण्याची शक्यता असल्याचे मत बाजारतज्ञांनी व्यक्त केले आहे. 

आज अ‍ॅमेझॉन इंडियाची सर्व कार्यालये अंधारात; यासाठी घेतला कंपनीने निर्णय

दरम्यान, आज मुंबई शेअर (Mumbai Share Market) बाजारातील एचसीएल टेक, बँक ऑफ बरोडा, रिलायन्स, एचडीएफसी बँक, एसबीआय, एनटीपीसी, इन्फोसिस, टीसीएस, टायटन, टेक महिंद्रा, ओएनजीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, बजाज ऑटो, डॉक्टर रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, पॉवरग्रिड, आयटीसी या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे पाहायला मिळाले. तर भारती एअरटेल, अ‍ॅक्सिस बँक, महाराष्ट्र बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, सेंट्रल बँक या कंपन्यांचे समभाग वधारले.       

संबंधित बातम्या