Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; सलग तिसऱ्या व्यवहारात वधारला

दैनिक गोमन्तक
बुधवार, 3 मार्च 2021

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या तिसऱ्या सत्रव्यवहारात मोठी उसळी घेतली आहे.

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या तिसऱ्या सत्रव्यवहारात मोठी उसळी घेतली आहे. देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स आज तब्बल 1147.76 अंकांनी वधारत 51,444.65 वर पोहचला. आणि त्यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326.50 अशांनी वाढत 15,245.60 च्या स्तरावर बंद झाला. आजच्या सत्रव्यवहारात मुंबई भांडवली बाजाराचा निर्देशांक बीएसई सकाळी कालच्या तुलनेत 441.32 अंकांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 145.3 अशांनी वाढत खुला झाला. त्यानंतर दिवसभराच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी खरेदीचे सत्र सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही निर्देशांक वाढल्याचे पाहायला मिळाले. 

अ‍ॅमेझॉनला या कारणामुळे बदलावा लागला लोगो; हिटलरच्या मिशांशी केली होती तुलना

भांडवली बाजाराने सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदवली आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहारात सोमवारी आणि दुसऱ्या सत्र व्यवहारात काल मंगळवारी देखील दोन्ही निर्देशांक वधारले होते. तर मागील महिन्याच्या आणि आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात भांडवली बाजाराने मोठी आपटी नोंदवली होती. फेब्रुवारी महिन्याच्या 26 तारखेला मुंबई शेअर मार्केटचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1939.32 अशांनी खाली येत 49,099.99 वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 568.20 अंकांनी घसरत 14,529.15 या स्तरावर बंद झाला होता. त्यामुळे सेन्सेक्स 50 हजाराच्या आणि निफ्टी 15 हजाराच्या खाली आला होता. मात्र त्यानंतर चालू आठवड्याच्या पहिल्या व्यवहारात आणि दुसऱ्या व्यवहारात पुन्हा तेजी नोंदवल्यामुळे सेन्सेक्स 50 हजारावर व निफ्टी 15 हजार पातळीच्या नजीक पोहचला होता. आणि त्यानंतर आजच्या उसळीने बीएसई पुन्हा 51 हजारावर व एनएसई 15 हजराच्या पार पोहचला. 

आजच्या व्यवहारात ओएनजीसी, एसबीआय, डॉक्टर रेड्डीज, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रिड, सेंट्रल बँक, बँक ऑफ बरोडा, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, आयटीसी,  बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, एचसीएल टेक,  एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, टीसीएस, एशियन पेंट, लार्सन अँड टुब्रो, टायटन, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचे समभाग वधारले. तर महाराष्ट्र बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, एनटीपीसी, मारुती सुझुकी यांच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली.  

एलॉन मस्कच्या गर्लफ्रेंडची कलाकृती अवघ्या 20 मिनिटांत करोडोंना विकली गेली

दरम्यान, आजच्या तिसऱ्या सत्र व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स 51,539.89 वर आणि निफ्टी 15,273.15 च्या उच्चांकी स्तरावर पोहचला होता. व दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सने 2.28 टक्क्यांनी आणि निफ्टीने 2.19 टक्क्यांनी वाढ नोंदवली. तर मागील सलग तीन व्यवहारांमध्ये मुंबई शेअर बाजाराने 4.71 टक्क्यांनी व राष्ट्रीय शेअर बाजाराने 4.86 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.           

  
 

संबंधित बातम्या