सेन्सेक्‍स  ४४ हजारांपार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

बॅंका तसेच वाहन उद्योगातील समभागांच्या खरेदीमुळे आज मुंबई शेअर बाजाराने इतिहासात प्रथमच ४४ हजारांचा टप्पा पार केला. दुसरीकडे निफ्टीनेदेखील आज सर्वकालिक उच्चांक नोंदवत १३ हजार अंशांना स्पर्श केला.  

मुंबई :  बॅंका तसेच वाहन उद्योगातील समभागांच्या खरेदीमुळे आज मुंबई शेअर बाजाराने इतिहासात प्रथमच ४४ हजारांचा टप्पा पार केला. दुसरीकडे निफ्टीनेदेखील आज सर्वकालिक उच्चांक नोंदवत १३ हजार अंशांना स्पर्श केला.  बुधवारी सकाळी बाजार सुरू झाल्यापासून ४४ हजारांच्या आसपास रेंगाळणाऱ्या सेन्सेक्‍सने दुपारनंतर ४४ हजारांपलीकडे झेप घेतली. ४४,२१५.४९ असा सर्वकालिक उच्चांक नोंदविल्यानंतर दिवसअखेरीस तो ४४,१८०.०५ अंशावर बंद झाला. कालच्या बंद भावापेक्षा २२७.३४ अंशांची ही वाढ आहे; निफ्टीनेदेखील आज १२,९४८.८५ अंशांचा सर्वकालिक उच्चांक नोंदवला; मात्र तेथून घसरून तो दिवस अखेरीस १२,९३८.२५ अंशांवर बंद झाला. 

संबंधित बातम्या