शेअर बाजाराची  834 अंशांची उसळी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

गेल्या दोन सत्रांमध्ये घसरण दाखविणाऱ्या भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी काल सुमारे पावणेदोन टक्के वाढ दाखवली.

मुंबई : गेल्या दोन सत्रांमध्ये घसरण दाखविणाऱ्या भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी काल सुमारे पावणेदोन टक्के वाढ दाखवली. निर्देशांक 834 अंशांनी; तर निफ्टी 293अंशांनी वधारला. आज दिवसअखेर निर्देशांक 49,398. अंशांवर; तर निफ्टी 14,521 अंशांवर स्थिरावला. यामुळे गेले दोन दिवस सुरू असलेली निर्देशांकांमधील घसरणही थांबली.

मंगळवारी सेन्सेक्‍सच्या प्रमुख 30 समभागांपैकी फक्त महिंद्र आणि महिंद्र, आयटीसी व टेक महिंद्र हे तीनच समभाग किरकोळ घसरले. उर्वरित सर्व 27 समभाग वधारले. बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स हे समभाग सर्वात जास्त म्हणजे सव्वापाच ते पावणेसात टक्के वाढले. त्याखेरीज एचडीएफसी, आयसीआयसीआय, लार्सन टुब्रो, सन फार्मा या समभागांचे दरही वाढले.

संबंधित बातम्या